'रामायण'मध्ये मंथरेच्या भूमिकेत दिसणार 'ही' दिग्गज अभिनेत्री; शाहरुखसोबत केली होती करिअरची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:23 IST2026-04-08T13:23:03+5:302026-04-08T13:23:43+5:30

'रामायण'मध्ये मंथरेची भुमिका कुणी साकारली, यावरून पडदा उठला आहे.  

Ramayana Cast Update Sheeba Chaddha To Play Manthara in Nitesh Tiwari Movie | 'रामायण'मध्ये मंथरेच्या भूमिकेत दिसणार 'ही' दिग्गज अभिनेत्री; शाहरुखसोबत केली होती करिअरची सुरुवात

'रामायण'मध्ये मंथरेच्या भूमिकेत दिसणार 'ही' दिग्गज अभिनेत्री; शाहरुखसोबत केली होती करिअरची सुरुवात

Ramayana : अभिनेता रणबीर कपूरच्या 'रामायण' (Ranbir Kapoor) या चित्रपटाची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. पहिल्या लूकपासूनच या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. बॉलिवूडमधील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक ठरलेला 'रामायण' गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांची ही महत्त्वाकांक्षी फिल्म दोन भागांमध्ये बनवली जाणार आहे. दरम्यान आता या 'रामायण'मध्ये मंथरेची भुमिका कुणी साकारली, यावरून पडदा उठला आहे.  

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण'मध्ये प्रभू रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी आणि रावणाच्या भूमिकेत यश हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. तर 'मंथरा' ही भूमिका अष्टपैलू अभिनेत्री शीबा चड्ढा (Sheeba Chaddha) साकारणार आहे. नितेश तिवारी या पात्राला एका वेगळ्या आणि सखोल दृष्टिकोनातून मांडणार आहेत. शीबा चड्ढा यांच्यासारखी अनुभवी अभिनेत्री हे पात्र साकारणार असल्याने, मंथरा आणि कैकेयी यांच्यातील संवाद आणि कारस्थान पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


दिल्लीत जन्मलेल्या शीबा चड्ढा यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीवरून केली. दिल्ली विद्यापीठात शिकत असतानाच त्यांनी नाटकांमध्ये आपली छाप पाडली होती. विशेष म्हणजे, त्यांनी १९९८ मध्ये शाहरुख खानच्या 'दिल से' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आज त्या इंडस्ट्रीतील एक अत्यंत सन्माननीय आणि कसलेल्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. शीबा चड्ढा यांनी 'बधाई हो', 'दम लगा के हैशा' आणि 'गली बॉय' सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. केवळ चित्रपटच नाही, तर 'मिर्झापूर' आणि 'बंदिश बँडिट्स' सारख्या वेब सिरीजमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 

Web Title : रणबीर कपूर की 'रामायण' में शीबा चड्ढा बनेंगी मंथरा।

Web Summary : रणबीर कपूर अभिनीत नितेश तिवारी की 'रामायण' में शीबा चड्ढा मंथरा की भूमिका निभाएंगी। उन्होंने शाहरुख खान के साथ शुरुआत की और 'बधाई हो' और 'मिर्जापुर' जैसी वेब सीरीज में अपने अभिनय के लिए जानी जाती हैं।

Web Title : Sheeba Chadha to play Manthara in Ranbir Kapoor's 'Ramayana'.

Web Summary : Sheeba Chadha will portray Manthara in Nitesh Tiwari's 'Ramayana,' starring Ranbir Kapoor as Ram. She debuted with Shah Rukh Khan and is known for her versatile acting in films like 'Badhaai Ho' and web series like 'Mirzapur.'