'रमैया वस्तावैया'मधील 'राम'चा बदलला लूक, ओळखणं झालं कठीण; अभिनयाला रामराम करून आता करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:25 IST2025-09-15T14:24:38+5:302025-09-15T14:25:26+5:30

'Ramaiya Vastavaiya' fame Ram Aka Girish Kumar : गिरीश कुमारने २०१३ मध्ये प्रभू देवा दिग्दर्शित रोमँटिक चित्रपट 'रमैया वस्तावैया'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने श्रुती हासनसोबत काम केले होते.

'Ramaiya Vastavaiya' fame Ram Aka Girish Kumar has changed his look, it has become difficult to recognize him; He is now doing this work after quitting acting | 'रमैया वस्तावैया'मधील 'राम'चा बदलला लूक, ओळखणं झालं कठीण; अभिनयाला रामराम करून आता करतोय हे काम

'रमैया वस्तावैया'मधील 'राम'चा बदलला लूक, ओळखणं झालं कठीण; अभिनयाला रामराम करून आता करतोय हे काम

अभिनेता गिरीश कुमार(Girish Kumar)ने 'रमैया वस्तावैया' (Ramaiya Vastavaiya Movie) या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याने 'लवशुदा' या चित्रपटात काम केले, जो फारसा यशस्वी झाला नाही. यानंतर गिरीशने अभिनय क्षेत्राला रामराम केले आणि कौटुंबिक व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. आज गिरीश अनेक स्टार अभिनेत्यांपेक्षा जास्त श्रीमंत आहे. तो 'टिप्स इंडस्ट्रीज' (Tips Industries) कंपनीचा सीओओ (COO) आहे.

गिरीश कुमारने २०१३ मध्ये प्रभू देवा दिग्दर्शित रोमँटिक चित्रपट 'रमैया वस्तावैया'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने श्रुती हासनसोबत काम केले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली असली तरी, त्याची कथा आणि हिट गाण्यांमुळे तो खूप लोकप्रिय झाला. गिरीशला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकनही मिळाले होते.

दोन चित्रपटांनंतर सोडला अभिनय
त्यानंतर २०१६ मध्ये त्याचा 'लवशुदा' हा चित्रपट रिलीज झाला, ज्यात तो नवनीत कौर ढिल्लनसोबत दिसला. हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि समीक्षकांनीही त्याला नापसंती दिली. यानंतर, गिरीशने अभिनयापासून हळूहळू स्वतःला दूर केले. सिनेइंडस्ट्री सोडल्यानंतर गिरीश क्वचितच प्रसिद्धीच्या झोतात असतो. जेव्हा तो कुठे दिसतो, तेव्हा त्याला ओळखणं कठीण झालं आहे, कारण त्याचा लूक पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे. अलीकडेच तो बांद्रा येथे स्पॉट झाला, तेव्हा तो पापाराझींना उत्साहाने भेटला. त्याने गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम पॅन्ट घातली होती आणि तो खूप छान दिसत होता. त्याला पाहून 'रमैया वस्तावैया'च्या आठवणींना उजाळा मिळाला.


रणबीर-रणवीरपेक्षा जास्त कमाई करतो गिरीश
गिरीशने फक्त दोन चित्रपटांत काम केले असले तरी, त्याची एकूण संपत्ती बॉलिवूडमधील काही स्टार कलाकारांपेक्षाही जास्त आहे. 'द इकॉनॉमिक टाइम्स' आणि 'हिंदुस्तान टाइम्स'च्या रिपोर्ट्सनुसार, त्याची संपत्ती सुमारे २,१६४ कोटी रुपये आहे. ही संपत्ती रणबीर कपूर (४०० कोटी रुपये), रणवीर सिंग (२४५ कोटी रुपये), वरुण धवन (३८० कोटी रुपये) आणि अगदी सुपरस्टार आमिर खान (१९०० कोटी रुपये) यांच्या संपत्तीपेक्षाही खूप जास्त आहे.

वैयक्तिक आयुष्य

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, गिरीशने त्याची बालपणीची मैत्रीण कृष्णा हिच्याशी लग्न केले आहे आणि आता त्याचा लूक खूप बदलला आहे. तो इतका बदलला आहे की त्याला एका क्षणात ओळखणंही कठीण झालं आहे.

Web Title: 'Ramaiya Vastavaiya' fame Ram Aka Girish Kumar has changed his look, it has become difficult to recognize him; He is now doing this work after quitting acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.