राम गोपाल वर्माचे करण जोहरवर ‘स्तुतीप्रेम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 15:07 IST2016-08-30T08:36:37+5:302016-08-30T15:07:14+5:30
ऐकून आश्चर्य वाटले ना? बी-टाऊनमध्ये राम गोपाल वर्मा आणि करण जोहर यांची ‘दुश्मनी’ चांगलीच प्रसिद्ध आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची ...
.jpg)
राम गोपाल वर्माचे करण जोहरवर ‘स्तुतीप्रेम’
ऐ ून आश्चर्य वाटले ना? बी-टाऊनमध्ये राम गोपाल वर्मा आणि करण जोहर यांची ‘दुश्मनी’ चांगलीच प्रसिद्ध आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या या ‘फ्रेनेमी’ जोडीचे ट्विटर वॉर तर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आज सकाळी मात्र सूर्य पश्चिमेला उगवला की काय असे विचारायला भाग पाडणारी गोष्ट घडली.
सतत इतरांवर नको त्या भाषेत आणि नको त्या वेळी ट्विटर बॉम्ब फोडणाऱ्या रामूने चक्क करणच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या टीझरची तोंडभरून स्तुती केली. ऐश्वर्या-रणबीर-अनुष्का स्टारर या बहुप्रतीक्षीत चित्रपटाचा आज यूट्यूबवर टीझर दाखल झाला. तब्बल चार वर्षांनी दिग्दर्शच्या भूमिकेत परतणाऱ्या करणच्या या सिनेमाविषयी चाहते आणि इंडस्ट्रीतील सर्वांनाचा कमालीची उत्सुकता होती.
टीझर आॅनलाईन गेल्यावर चोहीबाजूने करण आणि टीमवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. या सगळ्या स्तुतीसुमनांमध्ये आमचे लक्ष वेधून घेतले ते राम गोपाल वर्मांच्या ट्विटने. रामूने ‘ऐ दिल है मुश्किल’ बद्दल ट्विट केले म्हटल्यावर काही तरी खरमरीत टीका किंवा टोमणा वाचायला मिळणार अशी अपेक्षा होती पण रामूने जे लिहिले ते वाचून आश्चर्याचा धक्काच बसला.
रामूने लिहिले, ‘करण तु रणबीरच्या चेहºयाचा ज्या प्रकारे दीर्घकाळ क्लोजअप घेतला, मी तर त्याच्या प्रेमातच पडलो. यावरून स्पष्ट दिसते की, तु किती मन लावून हा चित्रपट बनवला आहे. खरंच खूप छान!’ हे वाचून करणला कदाचित त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नसेल. पण म्हणतात ना, बॉलीवूड में कुछ भी हो सकता है. करणने मग ट्विट करून रामुचे आभार मानले. ‘धन्यवाद रामू!!! तु तर माझा दिवसच छान केला.’
आता खुद्द रामूच कौतुक करतोय म्हटल्यावर आमचीदेखील चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. आता ट्रेलर पाहून रामूची प्रतिक्रिया काय असेल याकडे आमचे लक्ष लागले आहे. यावर रितेश देशमुखनेदेखील मजेशीर ट्विट केले.
पूर्वी करण आणि अनुराग कश्यप यांची खुन्नस होती. पण आता दोघे इंडस्ट्रीमधील ‘बेस्ट फ्रेंड’ म्हणून ओळखले जातात. एवढेच नाही तर अनुरागने ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये करणला मुख्य खलनायकाचा रोल दिला होता. म्हणजे आता रामूची ‘दुश्मनी’सुद्धा ‘दोस्ती’मध्ये रुपांतरित होत आहे का? आगामी काळात रामू-करण इंडस्ट्रीमधील न्यू बेस्ट फ्रेंड कपल म्हणून पाहायला मिळेल का अशा अनेक तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे. ते होणे स्वाभाविकच आहे म्हणा.

@karanjohar I love the long hold on Ranbir's close up ..it indicates with what passion u made this film..Suuuuperrb https://t.co/1B8OcgzUFy— Ram Gopal Varma (@RGVzoomin) 30 August 2016
रामूने लिहिले, ‘करण तु रणबीरच्या चेहºयाचा ज्या प्रकारे दीर्घकाळ क्लोजअप घेतला, मी तर त्याच्या प्रेमातच पडलो. यावरून स्पष्ट दिसते की, तु किती मन लावून हा चित्रपट बनवला आहे. खरंच खूप छान!’ हे वाचून करणला कदाचित त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नसेल. पण म्हणतात ना, बॉलीवूड में कुछ भी हो सकता है. करणने मग ट्विट करून रामुचे आभार मानले. ‘धन्यवाद रामू!!! तु तर माझा दिवसच छान केला.’
Ramu!!! I think you have just made my day!!! https://t.co/BIsQm4gRWr— Karan Johar (@karanjohar) 30 August 2016
आता खुद्द रामूच कौतुक करतोय म्हटल्यावर आमचीदेखील चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. आता ट्रेलर पाहून रामूची प्रतिक्रिया काय असेल याकडे आमचे लक्ष लागले आहे. यावर रितेश देशमुखनेदेखील मजेशीर ट्विट केले.
Aap Dono Ke Mooh Se, Yehi Sunne Ke Liye Mere Kaan Taras Gaye the!! @karanjohar@RGVzoomin -Kya Kare #AeDilHaiMushkilhttps://t.co/lkmaBSKXNF— Riteish Deshmukh (@Riteishd) August 30, 2016