​राम गोपाल वर्माचे ‘अनुराग’ प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 12:10 IST2016-04-19T06:40:34+5:302016-04-19T12:10:34+5:30

आॅल टाईम कॉन्ट्रोव्हर्सी किंग राम गोपाल वर्मा आणि अनुराग कश्यप यांचे ‘संबंध’ तर सर्वांनाचा माहित आहेत. दोघे एकमेकांवर टीका ...

Ram Gopal Varma's 'Anurag' love | ​राम गोपाल वर्माचे ‘अनुराग’ प्रेम

​राम गोपाल वर्माचे ‘अनुराग’ प्रेम

ल टाईम कॉन्ट्रोव्हर्सी किंग राम गोपाल वर्मा आणि अनुराग कश्यप यांचे ‘संबंध’ तर सर्वांनाचा माहित आहेत. दोघे एकमेकांवर टीका करत असतात, खिल्ली उडवत असतात.

अनुरागने वर्मांच्या सर्वात मोठा ट्विटर शत्रू करण जोहरशी ‘दोस्ताना’ वाढवल्यामुळे तर ‘आरजीव्ही’ त्याच्यावर आणखीच भडकले.

वर्माचा आगामी चित्रपट ‘वीरप्पन’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात जेव्हा त्याला अनुराग कश्यपविषयी विचारले असता तो म्हणाला, अनुराग आणि माझ्यात कधीच शीत युद्ध नव्हते. कारण मी नेहमीच ‘हॉट वॉर’ करतो. आणि अनुरागच्या बाबतीत बोलायचे तर माझ्यातर्फे काहीच प्रॉब्लेम नाही. उलट त्यालाच माझा तिरस्कार आहे.

विशेष म्हणजे अनुराग एकेकाळी वर्माचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असे. रामुच्या ‘सत्या’ चित्रपटाची पटकथा अनुरागने लिहिली होती.

पुढे बोलताना रामू म्हणाला की, अनुरागला माझे सर्वच चित्रपट वाईट वाटतात आणि मला त्याचे काही चित्रपट आवडतात. आमच्या दोघांत जर मधुर संबंध नसतील तर त्याला मी जबाबदार नाही एवढे मी सांगू शकतो.

आता रामू बोलण्यात कोणाला ऐकू शकतो का?

Web Title: Ram Gopal Varma's 'Anurag' love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.