राम गोपाल वर्मांकडून कॅटचा बचाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 18:18 IST2016-09-19T12:48:13+5:302016-09-19T18:18:13+5:30

कॅटरिना कैफ हिला स्मिता पाटील पुरस्कार जाहिर झाला आणि  कॅटचा हा पुरस्कार सोशल मीडियावर खिल्लीचा विषय ठरला. स्मिता पाटील ...

Ram Gopal Varma protects CAT! | राम गोपाल वर्मांकडून कॅटचा बचाव!

राम गोपाल वर्मांकडून कॅटचा बचाव!

टरिना कैफ हिला स्मिता पाटील पुरस्कार जाहिर झाला आणि  कॅटचा हा पुरस्कार सोशल मीडियावर खिल्लीचा विषय ठरला. स्मिता पाटील व कॅटची तुलनाच नाही. तेव्हा कॅटरिनाला स्मिता पाटील पुरस्कार मिळणे म्हणजे मोठ्ठा ‘विनोद’ आहे, अशा प्रतिक्रिया काही नेटीझन्सनी व्यक्त केल्या. अर्थात  खिल्ली उडवणाºया या नेटीझन्सला कॅटने काहीही उत्तर दिलेले नाही. पण  दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी मात्र कॅटरिनावर टीका करणाºयांना चांगलेच फटकारले आहे. कॅटरिना बॉलिवूडमध्ये एकदम नवखी होती, तेव्हा रामगोपाल वर्मा यांनी तिच्यासोबत काम केले होते. रामगोपाल यांच्या ‘सरकार’मध्ये कॅट दिसली होती. त्यामुळेच रामगोपाल वर्मा हे कॅटरिनाचा बॉलिवूडमधील प्रवासाचे साक्षीदार आहेत. याच अधिकारवाणीतून त्यांनी कॅटरिनाची खिल्ली उडवणाºयांना धोबीपछाड दिले आहे. स्मिता पाटील व कॅटरिना या दोघींमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे. पण म्हणून कॅटरिनाच्या उपलब्धी कमी होत नाहीत. खुद्द स्मिता पाटील हयात असत्या तर त्यांनाही कॅटरिनाला हा पुरस्कार जाहिर झालेला पाहून आनंदच झाना असता. कॅटरिना बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिच्याकडे ना आवाज होता, ना अभिनयाचा गुण आणि ना डान्सिंग स्टाईल. पण यानंतर कॅटरिनाने मिळवलेले यश सगळ्यांना आश्चर्यचकीत करणारे आहे, असे रामगोपाल वर्मा यानी म्हटले आहे. स्मिता पाटीलकडे सगळे काही होते. पण कॅटरिनाकडे काहीही नव्हते. पण तिने अपार कष्टाच्या जोरावर सर्व काही मिळवले. ही तिची खूप मोठी उपलब्धी आहे. आपल्या १३ वर्षांच्या करिअरमध्ये कॅटरिना मोठे यश कमावले. हिंदी सिनेमाच्या चौकटीत फिट बसण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘बार बार देखो’मध्ये कॅटरिनाचा अभिनय कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 



{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Ram Gopal Varma protects CAT!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.