​‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ला विरोध करणा-यांची राम गोपाल वर्मा यांनी केली ‘धुलाई’! पाहा व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 13:27 IST2018-01-23T07:56:24+5:302018-01-23T13:27:13+5:30

होय, राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रामगोपाल वर्मा विरोध करणा-यांची धुलाई करताना दिसताहेत.

Ram Gopal Varma has protested against 'God, Sex and Truth'. Watch video !! | ​‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ला विरोध करणा-यांची राम गोपाल वर्मा यांनी केली ‘धुलाई’! पाहा व्हिडिओ!!

​‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ला विरोध करणा-यांची राम गोपाल वर्मा यांनी केली ‘धुलाई’! पाहा व्हिडिओ!!

म गोपाल वर्मा यांचा ‘अंदाज’चं वेगळा आहे. होय, ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ या चित्रपटामुळे राम गोपाल वर्मा चर्चेत आहेत. अमेरिकन पोर्न स्टार मिया मल्कोवा हिच्यासोबत राम गोपाल वर्मा ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडे प्रसिद्ध झाला. या ट्रेलरमध्ये मिया मल्कोवा तिच्या सेक्सच्या अनुभवांवर बोलताना दिसली होती. मिया व राम गोपाल वर्मा यांचा हाच चित्रपट सध्या वादात सापडला आहे. यातील कंटेन्टला विरोध होत आहेत. पण सुरुवातीला आम्ही म्हणालो त्याप्रमाणे राम गोपाल वर्मा यांची बातचं न्यारी. विरोध करणारे अंगावर येण्याआधीच राम गोपाल वर्मा यांनी त्यांना शिंगावर घेतले. होय, राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रामगोपाल वर्मा विरोध करणा-यांची धुलाई करताना दिसताहेत. माझ्या चित्रपटाला जो कुणी विरोध करेल, त्यांची खैर नाही, अशा थाटात राम गोपाल वर्मा विरोधकांना धमकावत असल्याचे या व्हिडिओत दिसते आहे. ‘मिया मल्कोवाच्या गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथच्या काल्पनिक विरोधकांची पिटाई करताना,’ असे कॅप्शन रामगोपाल वर्मा यांनी या व्हिडिओला दिले आहे.
 


२६ वर्षीय मिया मल्कोवा  पोर्न इंडस्ट्रीत येण्याअगोदर ती चॅन मॅकडोनाल्ड आणि सिज्लर या रेस्टॉरंटमध्ये काम करीत होती. पुढे २०१२ मध्ये तिने पोर्न इंडस्ट्री ज्वाइन केली. तिची शालेय मैत्रीण आणि अ‍ॅडल्ट चित्रपटांमधील अभिनेत्री नताशा मल्कोवा हिने तिला इंडस्ट्रीत ओळख मिळवून दिली. तिच्या खºया नावाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण मिया मल्कोवा हे तिचे पोर्न इंडस्ट्रीतील नाव आहे. कारण या नावात रशियन आणि युरोपियन मॉडेलच्या नावांची फिलिंग येते, असे म्हटले जाते.

ALSO READ : पोर्नस्टारची भूमिका असलेला राम गोपाल वर्माचा ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ वादाच्या भोवऱ्यात!

येत्या  २५ तारखेला संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ रिलीज होतो आहे. याचदिवशी अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे आणि याच्या नेमक्या दुसºया दिवशी राम गोपाल वर्मांचा ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे.  

Web Title: Ram Gopal Varma has protested against 'God, Sex and Truth'. Watch video !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.