​राम गोपाल वर्मा यांना वाढदिवसाच्या दिवशी मिळाला ‘Devil Of Tweets ’चा किताब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 13:26 IST2017-04-07T07:50:39+5:302017-04-07T13:26:50+5:30

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा आज(७ एप्रिल) वाढदिवस. रामगोपाल वर्मा म्हणजे, वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. कायम वादग्रस्त tweets करून वाद ओढवून ...

Ram Gopal Varma got the book 'Devil Of Tweets' on his birthday! | ​राम गोपाल वर्मा यांना वाढदिवसाच्या दिवशी मिळाला ‘Devil Of Tweets ’चा किताब!

​राम गोपाल वर्मा यांना वाढदिवसाच्या दिवशी मिळाला ‘Devil Of Tweets ’चा किताब!

ग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा आज(७ एप्रिल) वाढदिवस. रामगोपाल वर्मा म्हणजे, वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. कायम वादग्रस्त tweets करून वाद ओढवून घेणे, हा त्यांचा आवडता छंद. आल्या दिवशी आपल्या tweetsने वाद निर्माण करणारे राम गोपाल वर्मा आपल्या वाढदिवशी शांत कसे बरे राहतील?  आज आपल्या ५५ व्या वाढदिवशी त्यांनी असाच एक बॉम्ब फोडला. होय,आज वाढदिवशी त्यांनी एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहून हसून हसून तुमचे पोट दुखल्याशिवाय राहणार नाही. हा फोटो म्हणजे रामूंना त्यांच्या एका फॉलोअरने वाढदिवसाची दिलेली भेट आहे.  या फॉलोअरने राम गोपाल यांना ‘Devil Of Tweets’ आणि ‘terrorist of films’ असे संबोधले आहे.
​आजच्या आपल्या पहिल्या tweetमध्ये राम गोपाल यांनी वाढदिवसाबद्दल नाराजीचा सूर आवळला आहे. मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणा-यांना मी सांगू इच्छितो की, माझ्यासाठी हा दु:खद दिवस आहे. कारण मी एका वर्षाने म्हातारा होत आहे,असे tweet त्यांनी केले आहे. यानंतर त्यांनी एक मजेशीर फोटो शेअर केलाय.  



ALSO READ :  राम गोपाल वर्मा पुन्हा बरळलेच...

या फोटोत रामू एका पक्षावर बसून आकाशात उडताहेत. त्यांच्या एका हातात बॉटल आणि दुस-या हातात मोबाईल दिसतोय. (याचा अर्थ रामू जणू नशेत टिष्ट्वट करतात, असा घेऊ शकता.) या फोटोत राम गोपाल यांना ‘Devil Of Tweets’ आणि ‘terrorist of films’ असे संबोधले आहे. अर्थात राम गोपाल यांनी हा किताब मस्तपैकी एन्जॉय केला आहे. माझा द्वेष करणा-याने हे बनवले आहे. यासाठी माझ्याकडून त्याला खूप खूप प्रेम, असे त्यांनी लिहिले आहे.
 

Web Title: Ram Gopal Varma got the book 'Devil Of Tweets' on his birthday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.