अर्णब गोस्वामीवर सिनेमा करणार राम गोपाल वर्मा; नाव वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 19:29 IST2020-08-04T19:21:19+5:302020-08-04T19:29:06+5:30

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात अर्णब गोस्वामी खूप सक्रिय आहे. सुशांतचा मृत्युला बॉलिवूड कसे जबाबदार आहे यावर अर्नबचे सतत डिबेट शो सुरू असतात. 

Ram Gopal Varma Announces Film On Arnab Goswami, It'll Be Called 'Arnab The News Prostitute' | अर्णब गोस्वामीवर सिनेमा करणार राम गोपाल वर्मा; नाव वाचून बसेल धक्का!

अर्णब गोस्वामीवर सिनेमा करणार राम गोपाल वर्मा; नाव वाचून बसेल धक्का!

समाजामध्ये घडणाऱ्या नाट्यमय घटनांच्या शोधात सिनेमा दिग्दर्शक - निर्माते  नेहमी असतात. राजकारण हा त्यांच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. पक्ष, नेते त्यांचे शह-काटशह यांना नेहमी चंदेरी पडद्यावर आणलं जातं. पण, सर्वसामान्य रसिकांसह बड्या निर्मात्यांनाही एका पत्रकाराच्या नावाची भुरळ पडल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रख्यात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीच त्यांच्या नव्या को-या सिनेमाची घोषणा केली आहे. ‘अर्णब- द न्यूज प्रॉस्टिट्यूट’ असे या सिनेमाचे नाव आहे.  सिनेमाच्या नावामुळे राम गोपाल वर्मा यांचा सिनेमा पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारीकेवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राम गोपाल वर्मा यांनी अर्णब गोस्वामींवर निशाणा साधत सिनेमाची घोषणा केली आहे. 

सिनेमाची घोषणा केल्यानंतर राम गोपाल वर्मा यांना पुन्हा एकदा ट्रोल केेले जात आहे. समाजात ख-या गोष्टी बोलणा-यांना  कशा रितीने गप्प केले जाईल याकडेच जास्त प्रयत्न केला जातो. अशा संतप्त प्रतिक्रीयाही या ट्वीटवर उमटत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा युजर्सच्या संतप्त प्रतिक्रीयांचा सामना राम गोपाल वर्मा यांना करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


खरंतर सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. बॉलिवूडसुद्धा दोन गटात विभागला आहे. त्याचवेळी पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे वर्णन खलनायक म्हणून केले जात आहे. वास्तविक, सुशांतसिंग राजपूत प्रकरणात अर्णब गोस्वामी खूप सक्रिय आहे. सुशांतचा मृत्युला बॉलिवूड कसे जबाबदार आहे यावर अर्नबचे सतत डिबेट शो सुरू असतात. 

अर्णब गोस्वामींवर निशाणा साधत रामू यांनी दुसरे ट्वीट करत सांगितले की, अर्नब गोस्वामी सुशांत सिंहच्या आत्महत्येचा बॉलिवूडशी संबंध असल्याचे सांगत असतो.  इतकेच नाही तर जिया खान, श्रीदेवी, दिव्या भारती यांच्याही मृत्यूला बॉलिवूडच जाबाबदार असल्याचे सांगतो. या सगळ्या घटना या 25 वर्षात घडल्या आहेत. अर्नब नेहमीच बॉलिवूडबद्दल काही ना काही बरळत  असतो, त्याचे बॉलिवूडविषयी असलेले विचार पाहून मी स्वतः हैराण आहे.'माझा आदित्य चोप्रा, करण जोहर, महेश भट्ट, शाहरुख खान आणि सलमान खान आणि इतर लोकांना एक शेवटचा सल्ला आहे. सिनेमांमध्ये नायक बनवणे आणि होणे पुरेसे नाही. अर्नब गोस्वामी यांच्यासारख्या खलनायकाविरूद्ध आता आवाज उठवणे आवश्यक आहे. ”

Web Title: Ram Gopal Varma Announces Film On Arnab Goswami, It'll Be Called 'Arnab The News Prostitute'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.