राम गोपाल वर्मा यांनी केली 'सरकार ४'ची घोषणा, कधी सुरु होणार शूटिंग? दिली अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 09:21 IST2026-03-14T09:21:27+5:302026-03-14T09:21:54+5:30

गोविंदा गोविंदा,,, पुन्हा पडद्यावर ऐकू येणार? 'सरकार ४'मध्ये कोण दिसणार?

Ram Gopal Varma announced Sarkar 4 shoot will start next month know more | राम गोपाल वर्मा यांनी केली 'सरकार ४'ची घोषणा, कधी सुरु होणार शूटिंग? दिली अपडेट

राम गोपाल वर्मा यांनी केली 'सरकार ४'ची घोषणा, कधी सुरु होणार शूटिंग? दिली अपडेट

बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेतल्या आणि सुपरहिट सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये राम गोपाल वर्मा यांचं नाव येतं. 'सत्या','रंगीला','भूत' आणि 'सरकार' असे अनेक हटके सिनेमे त्यांनी दिले. या सिनेमांमधून त्यांचं वेगळेपण दिसून आलं. अमिताभ बच्चन यांच्या करिअरमध्ये 'सरकार' सिनेमाचं मोठं स्थान आहे. आतापर्यंत या पॉलिटिकल क्राइम ड्रामा सिनेमाचे तीन पार्ट आले आहेत. तर आता राम गोपाल वर्मा यांनी 'सरकार ४'ची घोषणा केली आहे. 

रेड लॉरी फिल्म फेस्टिवलवेळी राम गोपाल वर्मा म्हणाले, "मी सरकार ४ बनवत आहे. याचं शूट पुढील महिन्यात सुरु होईल." शिवाय त्यांनी आणखी एक प्रोजेक्ट 'द सिंडिकेट'वरही भाष्य केलं. ते गंमतीत म्हणाले, "हा सिनेमा माझे सगळे पाप धुवेल".

२००५ साली 'सरकार' आला होता. अमिताभ बच्चन यांनी सुभाष नागरे ची भूमिका साकारली होती. तर अभिषेक बच्चन त्यांच्या मुलाच्या शंकरच्या भूमिकेत होता. यानंतर २००८ मध्ये 'सरकार राज' आला. यामध्ये ऐश्वर्या रायही जोडली गेली. २०१७ साली 'सरकार ३' भेटीला आला. यामध्ये अमिताभ-अभिषेक यांच्यासोबत यामी गौतम, मनोज वाजपेयी आणि अमित साध हे कलाकार होते. आता 'सरकार ४'ची घोषणा होताच सिनेप्रेमींचीं उत्सुकता वाढली आहे. अद्याप कास्टिंगबद्दल माहिती आलेली नाही.
 

 

Web Title : राम गोपाल वर्मा ने 'सरकार 4' की घोषणा की; जल्द शुरू होगी शूटिंग

Web Summary : राम गोपाल वर्मा ने अमिताभ बच्चन अभिनीत अपनी राजनीतिक अपराध नाटक श्रृंखला 'सरकार 4' की घोषणा की। शूटिंग अगले महीने शुरू होगी। आरजीवी ने अपनी आगामी परियोजना 'द सिंडिकेट' का भी उल्लेख किया।

Web Title : Ram Gopal Varma Announces 'Sarkar 4'; Filming to Begin Soon

Web Summary : Ram Gopal Varma announced 'Sarkar 4,' the next installment in his political crime drama series starring Amitabh Bachchan. Shooting begins next month. RGV also mentioned his upcoming project 'The Syndicate'.