Ram Charanच्या पत्नीनं मागितली सिद्धार्थ आणि कियाराची माफी, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:13 IST2023-02-08T17:12:41+5:302023-02-08T17:13:17+5:30
Sidharth Malhotra-Kiara Advani : सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचा बोलबाला आहे. या जोडप्याने ७ फेब्रुवारीला जैसलमेरमध्ये धूमधडाक्यात लग्न केले.

Ram Charanच्या पत्नीनं मागितली सिद्धार्थ आणि कियाराची माफी, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण
सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या लग्नाचा बोलबाला आहे. या जोडप्याने ७ फेब्रुवारीला जैसलमेरमध्ये धूमधडाक्यात लग्न केले, ज्यामध्ये करण जोहर ते शाहिद कपूर, मीरा राजपूत, मनीष मल्होत्रा, जुही चावला यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते.
रात्री उशिरा या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले, ज्यावर सेलेब्स आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. या जोडप्याच्या पोस्टवर, आलिया भट ते कतरिना कैफसह सर्वजण नवीन आयुष्य सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत आहेत, परंतु एक सेलिब्रिटी आहे जिने कियारा आणि सिडची जाहीर माफी मागितली आहे.
वास्तविक, RRR फेम अभिनेता राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी हिने कियाराला तिच्या पोस्टवर शुभेच्छा दिल्या आणि तिची माफीही मागितली. तिने कमेंटमध्ये लिहिले- अभिनंदन.. हे खूप सुंदर आहे. माफ करा आम्ही तिथे असू शकलो नाही. तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम.
उपासनाच्या या कमेंटवरून हे स्पष्ट झाले आहे की, कियारा अडवाणीने राम चरण आणि उपासना कामिनेनी यांना तिच्या लग्नाचे आमंत्रण पाठवले होते, परंतु काही कारणास्तव या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. अशा स्थितीत उपासनाने माफी मागितली.
कियारा लवकरच राम चरण सोबत एस. शंकर यांच्या आगामी अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे. या दोघांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचे न्यूझीलंडमधील शेड्यूल पूर्ण केले आणि त्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हा त्यांचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी, दोघांनी बोयापती श्रीनूच्या विनया विधेय रामामध्ये स्क्रीन शेअर केली होती.