जगातील 5 व्या क्रमांकाच्या हिऱ्याची मालकिण आहे तमन्ना भाटिया, 'या' खास व्यक्तीने केलाय गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 09:22 IST2023-07-25T09:10:40+5:302023-07-25T09:22:59+5:30

तमन्ना भाटियाकडे जगातील सर्वात महागडे दागिने आहेत. तिच्याकडे जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा हिरा आहे. ज्याची किंमत कोट्यवधीमध्ये आहे.

Ram charan wife upasana kamineni gave tamannaah bhatia the world fifth largest diamond | जगातील 5 व्या क्रमांकाच्या हिऱ्याची मालकिण आहे तमन्ना भाटिया, 'या' खास व्यक्तीने केलाय गिफ्ट

जगातील 5 व्या क्रमांकाच्या हिऱ्याची मालकिण आहे तमन्ना भाटिया, 'या' खास व्यक्तीने केलाय गिफ्ट

तमन्ना भाटिया(Tamannaah Bhatia)ने साऊथ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पडद्यावरच्या तिच्या वेगळ्या अभिनयासाठी ती ओळखली जाते. तमन्ना भाटियाने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.  गेल्या काही दिवसांपासून तमन्नाची खुपच चर्चा आहे.

तमन्ना भाटिया नुकतीच लस्ट स्टोरीमध्ये दिसली. यात तिची जोडी अभिनेता विजय वर्मासोबत दिसली होती. दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली आणि अनेक इंटिमेट सीन्सही दिले. दरम्यान, आता ही अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.

 तमन्ना भाटियाकडे जगातील सर्वात महागडे दागिने आहेत. तिच्याकडे जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा हिरा आहे. ज्याची किंमत कोट्यवधीमध्ये आहे, जे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतात. आता हा हिरा तमन्नाकडे कुठून आणि केव्हा आला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, आम्ही तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो.

राम चरणची पत्नी उपासना हिने तमन्ना भाटियाचा हिऱ्याच्या अंगठीसोबतचा फोटो 2019 मध्ये शेअर केला होता. जो आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उपासनाने ट्विटरवर हा फोटो शेअर करत लिहिले होते, ''निर्मात्यांकडून सुपर तमन्ना भाटियाला एक गिफ्ट. तुला खूप मिस करतेय. भेटू लवकरच.'' तर तमन्नाने हा फोटो रि-शेअर करत तिचे आभार मानले होते. 

‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’मधील अभिनय पाहून उपासनाने तमन्नाला हा हिरा गिफ्ट केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या हिऱ्याची किंमत जवळपास दोन कोटीहुन अधिक आहे.  ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सुरेन्द्र रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि राम चरण याने प्रोड्यूस केला आहे. तमन्नाने यात लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत चिरंजीवी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यात भूमिकेत आहेत. 

Web Title: Ram charan wife upasana kamineni gave tamannaah bhatia the world fifth largest diamond