काय सांगता! अनिल कपूरने राम चरणला ऑफर केला होता या सुपरहिट सिनेमाचा हिंदी रिमेक, पण अभिनेता म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:31 PM2023-03-29T12:31:24+5:302023-03-29T12:33:54+5:30

फार कमी लोकांना माहिती आहे की, अनिल कपूरने राम चरणला बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती, पण...

Ram charan offered hindi remake of magadheera but he refused to take it up read details inside | काय सांगता! अनिल कपूरने राम चरणला ऑफर केला होता या सुपरहिट सिनेमाचा हिंदी रिमेक, पण अभिनेता म्हणाला..

काय सांगता! अनिल कपूरने राम चरणला ऑफर केला होता या सुपरहिट सिनेमाचा हिंदी रिमेक, पण अभिनेता म्हणाला..

googlenewsNext

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राम चरण जगभर प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. आजकाल राम चरणचे अनेक चित्रपट आहेत, जे एकामागून रिलीज होणार आहे. फार कमी लोकांना माहित आहे की काही दिवसांपूर्वी राम चरणला बॉलिवूड चित्रपट ऑफर करण्यात आला होता पण त्याने नकार दिला. 


ऑफर झाला होता हिंदी रिमेक 
राम चरणचा 2009 साली प्रदर्शित झालेला मगधीरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. हा सिनेमा एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या यशानंतर अनेक बॉलिवूड निर्माते राम चरणला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विचार करत होते. त्याला 'मगधीरा'च्या हिंदी रिमेकची ऑफरही आली होती, पण त्याने ती नाकारली.


राम चरणने नाकारली होती ऑफर 
'मगधीरा' पाहिल्यानंतर अनिल कपूर राम चरणवर खूप प्रभावित झाले आणि त्यांनी अभिनेत्यासोबत हिंदी रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. खुद्द राम चरणने एक मुलाखतीत हा खुलासा केला होता तो म्हणाला, 'काही दिवसांपूर्वी जेव्हा मी अनिल कपूरला भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी बोनी कपूरला तुला घेऊन मगधीराचा हिंदी रिमेक करायला सांगेन, पण मी म्हणालो की मला रिमेक करायचा आहे की नाही हे माहित नाही? मगधीरा हा अतिशय सुंदर चित्रपट आहे, जो पुन्हा तयार करता येणार नाही.


मगधीरामध्ये राम चरणसोबत काजल अग्रवालसुद्धा होती. यात अभिनेत्याचा डबल रोल होता. सिनेमाची कथा राम चरणाच्या पुर्नजन्माभवती फिरते. या सिनेमात देव गिल, श्रीहरी, राव रमेश आणि चिरंजीवी यांच्यादेखील भूमिका होत्या. 'RRR'च्या यशानंतर राम चरण आता 'गेम चेंजर' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात त्याच्यासोबत कियारा अडवाणी स्क्रिन शेअर करणार आहे. एस शंकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
 

Web Title: Ram charan offered hindi remake of magadheera but he refused to take it up read details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.