सिड-कियाला Ram Charan सह 'आरसी 15'च्या संपूर्ण टीमनं दिलं स्पेशल सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 04:46 PM2023-02-13T16:46:03+5:302023-02-13T16:47:53+5:30

सिद्धार्थ आणि कियारा यांनी काल मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आपली रिसेप्शन पार्टी दिली. यामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी उपस्थितीही लावली होती.

Ram charan and rc 15 wishing the newlyweds kiara advani sidharth malhotra a happy married life in a special video | सिड-कियाला Ram Charan सह 'आरसी 15'च्या संपूर्ण टीमनं दिलं स्पेशल सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

सिड-कियाला Ram Charan सह 'आरसी 15'च्या संपूर्ण टीमनं दिलं स्पेशल सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)​​आणि कियारा अडवाणी(Kiara Advani) यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. कुटुंबीय आणि अगदी जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत या जोडप्याचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दोघांनी दिल्लीतील सिद्धार्थच्या घरी 'गृह प्रवेश' केला. सिद्धार्थ आणि कियारा यांनी १२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आपली रिसेप्शन पार्टी दिली. यामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी उपस्थितीही लावली होती. 'आरसी 15' मधील तिचा सहकलाकार राम चरण देखील कियाराच्या लग्नाला उपस्थित राहण्याची अपेक्षा होती, मात्र तो लग्नाला पोहोचू शकला नाही आणि सोशल मीडियावर जोडप्याला शुभेच्छा दिल्या.  आता 'आरसी 15' चित्रपटाच्या टीमने कियारा आणि सिडला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देणारा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

आरसी 15 टीम ने कियाराला सरप्राईज दिले
'आरसी 15' च्या टीमने शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राम चरण, गणेश आचार्य, दिग्दर्शक एस शंकर यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम दिसत आहे. या खास व्हिडिओमध्ये प्रत्येकजण चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणीला तिच्या लग्नासाठी खास शुभेच्छा देताना दिसत आहे. टीमचे सर्व लोक हातात फुले घेऊन दिसत आहेत. 'RC 15' च्या टीमने दिलेले हे सरप्राईज कियाराला नक्कीच आवडेल.


राम चरण आणि एस शंकर पहिल्यांदाच 'आरसी 15' मध्ये एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचे टायटल अद्याप जाहीर झालेले नाही. या चित्रपटाद्वारे शंकर तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच हैदराबादमधील चार मिनार येथे होणार आहे.

राम चरणचा(Ram Charan) हा एक राजकीय थ्रिलर चित्रपट असेल ज्यामध्ये त्याची दुहेरी भूमिका दिसणार आहे. कियारा अडवाणीशिवाय 'आरसी 15' मध्ये एसजे सूर्या, अंजली, जयराम, सुनील, श्रीकांत, नवीन चंद्रा, रघु बाबू हे कलाकार दिसणार आहेत. कियारा आणि राम चरण यांना चित्रपटाच्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
 

Web Title: Ram charan and rc 15 wishing the newlyweds kiara advani sidharth malhotra a happy married life in a special video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.