'RRR' च्या 'Naatu Naatu' गाण्यावर राम चरण-कीर्ति सुरेशचा जबरा डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 06:10 PM2022-01-27T18:10:39+5:302022-01-27T18:16:44+5:30

Ram Charan and Keerthy Suresh dance on RRR song Naatu Naatu : दोघेही यावेळी स्टेजवर होते आणि यावेळी आगामी 'RRR' सिनेमातील लोकप्रिय गाणं 'नाटू नाटू'ची हूक स्टेप करताना दिसले. दोघांचाही हा डान्स फॅन्सना चांगलाच आवडला. या डान्सचा दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Ram Charan and Keerthy Suresh dance on RRR song Naatu Naatu goes viral on social media | 'RRR' च्या 'Naatu Naatu' गाण्यावर राम चरण-कीर्ति सुरेशचा जबरा डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ

'RRR' च्या 'Naatu Naatu' गाण्यावर राम चरण-कीर्ति सुरेशचा जबरा डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ

googlenewsNext

साऊथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) अभिनेत्री कीर्ति सुरेशच्या (Keerthy Suresh) आगामी 'गुड लक सखी' सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये पोहोचला होता. दोघेही यावेळी स्टेजवर होते आणि यावेळी आगामी 'RRR' सिनेमातील लोकप्रिय गाणं 'नाटू नाटू'ची हूक स्टेप करताना दिसले. दोघांचाही हा डान्स फॅन्सना चांगलाच आवडला. या डान्सचा दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कीर्ति सुरेशचा सिनेमा 'गुड लक सखी' (Good Luck Sakhi) मध्ये तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली आहे. अभिनेता राम चरण या इव्हेंटमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून पोहोचला होता. यादरम्यान कीर्तिने रिक्वेस्ट केल्यावर राम चरणने 'RRR' सिनेमातील गाणं 'नाटू नाटू'ची हूक स्टेप केली. 

या इव्हेंटमध्ये राम चरणने चिरंजीवीबाबत म्हणाला की, 'त्यांनाही या कार्यक्रमात यायचं होतं आणि संपूर्ण टीमला अभिनंदन करायचं होतं. पण दुर्दैवाने ते येऊ शकले नाहीत'. चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली होती. ते सध्या क्वारंटाइन आहेत.

कीर्ति सुरेशबाबत सांगायचं तर 'गुड लक सखी' सिनेमाचा सोमवारी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा एक रोमॅंटिक-कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नागेश कुकुनूरने केलं आहे. हा एक महिला केंद्रीत स्पोर्ट्स ड्रामा आहे. हा सिनेमा २८ जानेवारीला सिनेमागृहात रिलीज होत आहे. 
 

Web Title: Ram Charan and Keerthy Suresh dance on RRR song Naatu Naatu goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.