रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियावर शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 15:36 IST2021-01-19T15:36:03+5:302021-01-19T15:36:07+5:30
या व्हिडिओमध्ये रकुल वर्कआऊट करताना दिसते आहे.

रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियावर शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला तिच्या फिटनेसला खूपच अर्लट असते. ती तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर करते. स्वत: ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये तासंतास घाम गळात असते. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रकुल वर्कआउट करताना दिसते आहे.
रकुलने शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ
व्हिडिओमध्ये रकुल स्क्वॅट्स आणि वेट लिफ्टिंग करताना दिसते आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "जीवनात चढ-उतार येत आहेत, मी त्यांना स्क्वॅट्स म्हणतो." रकुलचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती ‘अय्यारी’ या सिनेमात झळकली होती. शेवटची रकुल मरजावाँ सिनेमात दिसली होती. साऊथच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. रकुल पंजाबी असल्याने दक्षिणेत काम करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. पण सुरुवातीच्या काळात तिने अक्षरशः संवाद तोंडपाठ करायची. पहिला चित्रपट तिने केवळ पॉकेट मनीसाठी केला होता. पण या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तिला अनेक ऑफर मिळायला लागल्या आणि आता तर तिने दक्षिणेत अनेक चित्रपट केले आहे.