‘बाहुबली’च्या ‘भल्लालदेव’ला डेट करतेय अजय देवगणची ही हिरोईन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 15:13 IST2019-11-07T15:12:38+5:302019-11-07T15:13:25+5:30

होय, अजय देवगणची ही हिरोईन ‘बाहुबली’च्या एका अभिनेत्याला डेट करत असल्याचे कळतेय. हा अभिनेता दुसरा कुणी नसून  ‘बाहुबली’चा भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबाती आहे.

is rakul preet singh dating rana daggubati | ‘बाहुबली’च्या ‘भल्लालदेव’ला डेट करतेय अजय देवगणची ही हिरोईन!!

‘बाहुबली’च्या ‘भल्लालदेव’ला डेट करतेय अजय देवगणची ही हिरोईन!!

ठळक मुद्देलवकरच रकुलचा ‘मरजावां’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

लिंकअप आणि ब्रेकअपच्या बातम्या बॉलिवूडसाठी नव्या नाहीत. आता आणखी एका अभिनेत्रीच्या लिंकअपच्या चर्चा बी-टाऊनमध्ये चवीने चघळल्या जात आहेत. ही अभिनेत्री कोण तर रकुलप्रीत सिंग. होय, अजय देवगणची ही हिरोईन ‘बाहुबली’च्या एका अभिनेत्याला डेट करत असल्याचे कळतेय. हा अभिनेता दुसरा कुणी नसून  ‘बाहुबली’चा भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबाती आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रकुल व राणाच्या अफेअरच्या बातम्या चर्चा आहेत. अर्थात दोघेही यावर बोलायला तयार नाहीत. नुकतीच रकुल सोफी चौधरीच्या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला राणाबद्दल विचारण्यात आले. पण आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. मी फिल्मी करिअर सुरु करण्यापासून तो माझा मित्र आहे. तो माझा शेजारी आहे. शिवाय माझी बेस्ट फ्रेन्ड लक्ष्मी मांचू हिचाही मित्र आहे, असे रकुल म्हणाली. आता काय खरे ते रकुलच जाणो. पण तिच्यावर राणात काहीतरी शिजतेय इतके मात्र नक्की.

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात अजय देवगण, तब्बूसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत रकुल दिसली होती. रकुल गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे.

साऊथच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती ‘अय्यारी’ या सिनेमात झळकली होती. लवकरच रकुलचा ‘मरजावां’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात रकुलशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा, तारा सुतारिया, रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या 15 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: is rakul preet singh dating rana daggubati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.