अभिनेत्री रकुल प्रित सिंहची आमदार धिरज देशमुखांसाठी खास पोस्ट, म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 13:05 IST2024-04-07T13:04:56+5:302024-04-07T13:05:51+5:30

धिरज यांचा एक खास फोटो तिनं शेअर केला आहे. 

Rakul Preet Singh Birthday Wishes For Dhiraj Deshmukh | Dhiraj Wife Dipshikha Is Jackky Bhagnani Sister | अभिनेत्री रकुल प्रित सिंहची आमदार धिरज देशमुखांसाठी खास पोस्ट, म्हणाली…

अभिनेत्री रकुल प्रित सिंहची आमदार धिरज देशमुखांसाठी खास पोस्ट, म्हणाली…

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी 6 एप्रिल रोजी मोठ्या धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छा वर्षाव करण्यात आला. अभिनेत्री रकुल प्रित सिंगनेही धिरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धिरज एक खास फोटो तिनं शेअर केला आहे. 

रकुलनं धिरज देशमुख यांचा डान्स करताना फोटो सोशल मीडियावर शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं लिहलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, येणारं वर्ष आनंदाचं जावो आणि या वर्षात तुम्हाला हवं ते सर्व मिळो'. धिरज हे भगनानी कुटुंबाचे जावई आहेत. धीरज यांची पत्नी दीपशिखा आणि जॅकी सख्खी भावंडं आहेत. 

भाऊ धिरज यांची पत्नी दिपशिखा ही रकुल प्रितची सख्खी नणंद आहे. दीपशिखा ही जॅकी भगनानीची सख्खी बहीण आहे. रकुल व जॅकी यांचं फेब्रुवारी महिन्यात गोव्यात लग्न झालं. त्यांच्या लग्नातही धिरज यांनी हजेरी लावली होती. धीरज देशमुख या सोहळ्यात पापाराझींना मिठाई वाटताना दिसले होते. कारण ते लग्नसोहळ्यात धीरज जावयाचं कर्तव्य पार पाडताना दिसले होते.
 

Web Title: Rakul Preet Singh Birthday Wishes For Dhiraj Deshmukh | Dhiraj Wife Dipshikha Is Jackky Bhagnani Sister