पंतप्रधानांच्या आवाहनानंतर बॉलिवूड कपलने बदललं 'वेडिंग डेस्टिनेशन'? परदेशातला प्लॅन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 04:52 PM2024-01-31T16:52:36+5:302024-01-31T16:53:40+5:30

गेल्या सहा महिन्यांपासून रकुल प्रीत आणि जॅकी या लव्हबर्ड्सचं लग्न चर्चेत आहे.

Rakul Preet Singh and Jacky Bhagnani cancelled their wedding destination at aborad | पंतप्रधानांच्या आवाहनानंतर बॉलिवूड कपलने बदललं 'वेडिंग डेस्टिनेशन'? परदेशातला प्लॅन रद्द

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर बॉलिवूड कपलने बदललं 'वेडिंग डेस्टिनेशन'? परदेशातला प्लॅन रद्द

बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा सुरु आहे. निर्माता जॅकी भगनानी (Jacky Bhagnani) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यावर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. बॉलिवूडकरांनी देशाबाहेर न जाता भारतातच लग्न करावं असं एक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. तसंच मध्यंतरी मालदीव आणि भारत यांच्यात सोशल मीडियावर झालेल्या वादावेळीही बॉलिवूडकर देशाबाहेर डेस्टिनेशन वेडिंग करतात हा मुद्दा निघाला होता. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी ऐनवेळी परदेशातील ठिकाण रद्द करत भारतातच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून रकुल प्रीत आणि जॅकी या लव्हबर्ड्सचं लग्न चर्चेत आहे. दोघांनी मिडल ईस्टमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं आयोजन केलं होतं. मात्र लग्नाला काही दिवस बाकी असतानाच कपलने व्हेन्यूमध्येच बदल केला आहे. आता त्यांचं लग्न गोवा येथे होणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं की स्वत:चं तु्म्ही कौटुंबिक ग्रँड वेडिंग फंक्शन देशाबाहेर नाही तर देशातच करा. रकुल प्रीत आणि जॅकीने पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर आपलं वेडिंग लोकेशन बदललं असल्याची चर्चा आहे. 

सध्या दोघांच्या घरात लग्नाची लगबग सुरु झाली आहे. 21 फेब्रुवारी रोजी दोघंही लग्नबंधनात अडकतील अशी चर्चा आहे. दरम्यान वेडिंग लोकेशनबद्दलही कपलकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी काही दिवसांपूर्वीच कपलने देशाबाहेरील वेडिंग लोकेशन रद्द केलं आहे.

Web Title: Rakul Preet Singh and Jacky Bhagnani cancelled their wedding destination at aborad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.