'दे दे प्यार दे -२' सिनेमादरम्यान रकुलचा झालेला मोठा अपघात, 'असं' पूर्ण केलं शूटिंग; म्हणाली-"मी ४० दिवस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:01 IST2025-11-21T16:51:40+5:302025-11-21T17:01:39+5:30

रकुल प्रीत सिंगसोबत 'दे दे प्यार दे -२' च्या शूटिंगदरम्यान घडलेली मोठी घटना, अभिनेत्री म्हणाली... 

rakul preet recalls getting injured during de de pyaar de 2 movie know about what exactly happened | 'दे दे प्यार दे -२' सिनेमादरम्यान रकुलचा झालेला मोठा अपघात, 'असं' पूर्ण केलं शूटिंग; म्हणाली-"मी ४० दिवस..."

'दे दे प्यार दे -२' सिनेमादरम्यान रकुलचा झालेला मोठा अपघात, 'असं' पूर्ण केलं शूटिंग; म्हणाली-"मी ४० दिवस..."

Rakul Preet Singh:अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग स्टारर दे दे प्यार दे -२  सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. या चित्रपटाचं समीक्षकांसह प्रेक्षकांनी देखील भरभरुन कौतुक केलं आहे. रकुल-अजयची जोडी सिनेरसिकांच्या पसंतीस उतरली आहे. नुकतीच ,अभिनेत्रीने एका शोदरम्यान या चित्रपटाशी संबंधित एक घटना शेअर केली आहे. त्यामध्ये तिने सांगितले आहे की, शूटिंगदरम्यान तिच्याबरोबर एक भयानक अपघात झाला होता. 

रकुलने एका मुलाखतीत सांगितलं की, या चित्रपटाचं अर्ध शूटिंग  झाल्यानंतर तिचा मोठा अपघात झाला होता.त्या घटनेबद्दल सांगताना ती म्हणाली, "दे दे प्यार दे २' च्या शूटिंग दरम्यान माझ्यापाठीच्या कण्याला दुखापत होती.मी जवळपास चित्रपटाचं ५० टक्के शूटिंग पूर्ण केलं होतं. पण, या अपघातामुळे मी ४० दिवस अंथरुणावर पडून राहिले.त्यामुळे निर्मात्यांनी ३ महिन्यांसाठी शूटिंग थांबवले होते."

पुढे अभिनेत्रीने म्हटलं,"मी पुन्हा चालेन की नाही असं मला वाटत होतं.मला खुर्चीवर देखील व्यवस्थित बसता येत नव्हतं. त्यावेळी फिजिओथेरपिस्टसोबत माझ्या सोबतच असायचा. शिवाय चित्रपटातील 'हायवे' सीन दरम्यान, तिचे डॉक्टर जवळच एक बेड ठेवायचे आणि शूटिंग संपताच मी लगेच जाऊन लगेच आराम करायचे."


काय घडलेलं?

रकुल गेल्या काही दिवस बेडरेस्टवर होती. यामागचं कारण म्हणजे रकुल प्रीत सिंहला वर्कआऊट करताना इजा झाली. रकुलने बेल्ट न वापरता ८० किलोचं वजन उचलून डेडलिफ्टचा व्यायाम केला. त्यामुळे अभिनेत्रीची पाठ आखडली गेली. वेदना होऊनही रकुल वर्कआऊट करत राहिली. त्यामुळे तिची इजा आणखी वाढली.  त्यामुळे रकुलला चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलावं लागलं होतं. 

Web Title : 'दे दे प्यार दे 2' की शूटिंग के दौरान रकुल प्रीत सिंह का एक्सीडेंट।

Web Summary : 'दे दे प्यार दे 2' की शूटिंग के दौरान रकुल प्रीत सिंह को पीठ में चोट लगी। उसने 40 दिन आराम किया, जिससे शूटिंग में देरी हुई। उसने फिजियोथेरेपी सपोर्ट के साथ शूटिंग जारी रखी।

Web Title : Rakul Preet Singh's accident during 'De De Pyaar De 2' shooting.

Web Summary : Rakul Preet Singh suffered a back injury during 'De De Pyaar De 2' filming. She rested for 40 days, delaying the shoot. She continued filming with physiotherapy support.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.