Rakshabandhan Special : बॉलिवूड सेलिब्रेटींनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, आठवणींना दिला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 10:50 IST2021-08-22T10:50:36+5:302021-08-22T10:50:36+5:30
देशभरात आज रक्षाबंधनचा सण साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर भाऊ-बहिण एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत.

Rakshabandhan Special : बॉलिवूड सेलिब्रेटींनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, आठवणींना दिला उजाळा
देशभरात आज रक्षाबंधनचा सण साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर भाऊ-बहिण एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत. बॉलिवूडच्या कलाकारांनी आपल्या चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत आठवणींना उजाळा दिला.
धर्मेंद्र यांनी फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी रक्षाबंधन, हा सण कोणत्या पूजेपेक्षा कमी नाही.
एकता कपूरने आपला मुलगा रवी कपूरसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट शेअर करत लिहिले की, भावंडांसोबत राखी.
रणबीर कपूरची बहिण रिद्धीमाने भाऊ आणि आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी राखी टू द बेस्ट, लव्ह यू सो मच.
सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंग किर्तीने बालपणीचा फोटो शेअर करत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.