राखी सावंतचा आरोप; ‘सनी लिओनीने माझा नंबर पोर्न इंडस्ट्रीत दिला’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 20:52 IST2018-03-13T15:22:35+5:302018-03-13T20:52:35+5:30

आयटम गर्ल राखी सावंतला बॉलिवूडमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन या नावाने ओळखले जाते. राखी सध्या आयटम गर्ल सनी लिओनी हिच्यासोबत झालेल्या ...

Rakhi Sawant's allegation; 'Sunny Leone gave my number porn industry'! | राखी सावंतचा आरोप; ‘सनी लिओनीने माझा नंबर पोर्न इंडस्ट्रीत दिला’!

राखी सावंतचा आरोप; ‘सनी लिओनीने माझा नंबर पोर्न इंडस्ट्रीत दिला’!

टम गर्ल राखी सावंतला बॉलिवूडमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन या नावाने ओळखले जाते. राखी सध्या आयटम गर्ल सनी लिओनी हिच्यासोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. राखीने सनीवर एक गंभीर आरोप केला आहे. एका एंटरटेन्मेंट चॅनेलशी बोलताना राखीने सनीवर आरोप करताना म्हटले की, ‘सनीने माझा नंबर पोर्न इंडस्ट्रीवाल्यांना दिला आहे. त्यानंतर लोक सातत्याने मला फोन कॉल करून त्रास देत आहेत.’ राखीने म्हटले की, ‘सनीने माझा नंबर अ‍ॅडल्ट एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीला दिला आहे. ज्यानंतर तेथील लोक मला सातत्याने फोन करीत आहेत. ते मला माझ्या व्हिडीओ आणि मेडिकल सर्टिफिकेटबद्दल विचारत आहेत. तसेच मला चांगली आॅफर देत आहेत. परंतु या कामात मला अजिबातच रुची नाही. मी एकवेळा मृत्यूला कवटाळेल, परंतु अशाप्रकारच्या दुनियेत जाणे पसंत करणार नाही. 

राखीने म्हटले की, ‘मी सनीला जुळे मुले झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तिने मला एका अननोन क्रमांकावरून कॉल केला आणि विचारले की, मी तुझ्याबद्दल जेलस फील करते काय? परंतु मी तिचा तिरस्कार का करणार? मी बॉलिवूडमध्ये चांगले काम केले आहे. लोक परिवारासोबत बसून माझे काम बघत आहेत. माझे फक्त एवढेच म्हणणे आहे की, पोर्न इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी माझ्या नंबरचा चुकीचा वापर करू नये.’



राखी सावंत कलर्स टीव्हीवर प्रसारित होणाºया ‘बिग बॉस सीजन १’मध्ये सहभागी झाली होती. शोमध्ये राखी इतर स्पर्धकांसोबत वाद घालताना बघावयास मिळाली होती. याव्यतिरिक्त राखीने एका वाहिनीवर स्वत:चे स्वयंवरही रचले होते. स्वयंवरमुळे राखी टीव्ही जगतात खूपच चर्चेत आली होती. दरम्यान, राखी सावंतने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहेत. ‘मालामाल वीकली, क्रेझी-४, एक खिलाडी एक हसीना आणि लूट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती आयटम सॉन्ग करताना बघावयास मिळाली. 

Web Title: Rakhi Sawant's allegation; 'Sunny Leone gave my number porn industry'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.