Rakhi Sawantची आदिलनं केली मोठी फसवणूक, तिच्या हाती लागला मोठा पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 14:04 IST2023-02-09T14:03:49+5:302023-02-09T14:04:24+5:30
Rakhi Sawant : राखी सावंतच्या आयुष्यात सध्या बरीच उलथापालथ सुरू आहे.

Rakhi Sawantची आदिलनं केली मोठी फसवणूक, तिच्या हाती लागला मोठा पुरावा
राखी सावंत(Rakhi Sawant)च्या आयुष्यात सध्या बरीच उलथापालथ सुरू आहे. एकीकडे तिच्या आईचे निधन तर दुसरीकडे तिचा नवरा आदिल तिच्याशी भांडायचा, त्याचे दुसऱ्या मुलीशी अफेयर्स होते. या सगळ्यामुळे राखी सतत चर्चेत आहे. आता राखीला आणखी मोठा पुरावा हाती लागला आहे. यातून स्पष्ट होते की आदिलने राखीची मोठी फसवणूक केली आहे.
आदिलबाबत राखी सावंतला आणखी अनेक पुरावे मिळाले आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये राखीने सांगितले आहे की तिला न्याय मिळाला नाही, परंतु आदिलच्या पहिल्या लग्नाचे कार्ड, घटस्फोट आणि लग्नाची कागदपत्रे सापडली आहेत. हे सर्व पुरावे अभिनेत्री लवकरच न्यायालयात सादर करणार आहेत.
राखीच्या हाती लागले पुरावे
राखी आणि आदिलच्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. मंगळवारी सकाळी पोलिसांनी आदिलला त्याच्या घरातून अटक केली आणि त्यानंतर दिवसभर चौकशी सुरू होती. आदिलला अंधेरी न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आदिल राखीला करायचा मारहाण
बुधवारी, राखीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये तिने सांगितले की ती मेडिकलसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये जात आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणतेय - माझ्या शरीरावर कुठे जखमेच्या खुणा आहेत आणि आदिलने तिचा कसा छळ केला हे रुग्णालयातील डॉक्टर तपासतील. राखीने सांगितले की, तिला खूप त्रास दिला जात आहे, ती सर्व काही डॉक्टरांना सांगेल.
राखीने जुलैमध्ये केले होते आदिलसोबत लग्न
राखी सावंतने मीडियासमोर तिच्या आणि आदिलच्या लग्नाचा खुलासा केला होता. एवढेच नाही तर त्यांनी निकाहचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. एवढेच नाही तर तिने धर्म बदलून स्वतःचे नाव फातिमा ठेवले होते.