या कारणामुळे राखीने शेअर केला नाही नवऱ्याचा फोटो, राखीने स्वत: केला हा अजब खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 15:05 IST2019-08-21T15:03:32+5:302019-08-21T15:05:48+5:30
बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंतची ओळख आहे. प्रोफेशनल लाईफपेक्षा राखी तिच्या पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते

या कारणामुळे राखीने शेअर केला नाही नवऱ्याचा फोटो, राखीने स्वत: केला हा अजब खुलासा
बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंतची ओळख आहे. प्रोफेशनल लाईफपेक्षा राखी तिच्या पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राखीने एक रितेश नावाच्या एका एनआरआय बिझनेसमॅनसोबत राखीने गुपचूप लग्न केले आहे.. लग्न केल्यापासून राखी सांवत सतत कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत येते ऐवढेच नाही तर ती लग्नाला घेऊन रोज एक नवा खुलासा करत असते.
राखी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतेय लग्नाचे आणि हनीमूनचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. पण अजून राखीचा पती राकेश सोबतचा एकही फोटो शेअर केला नाही. राखीचा पती राकेश नक्की कसा दिसतो हे पाहण्याची उसुत्कता तिच्या फॅन्सना लागली आहे. अखेर राखीने राकेशचा फोटो का लपवून ठेवला आहे. या मागचे कारण सांगितले आहे.
स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार, माझ्या पतीला मीडियामध्ये चर्चेत राहणं पसंत नाही. त्याला कोणाच्या समोर येणं आवडतं नाही. लग्न ही गोष्ट खासगी आहे. त्यामुळे लग्नही गोष्ट त्याला कुटुंबापुरतीच मर्यादित ठेवायची आहे.
राखी म्हणते, माझा पती एनआरआय आहे. त्याचे नाव रितेश आहे आणि तो युकेचा आहे. लग्नानंतर तो लगेच परत गेला. माझ्या व्हिसाची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाली की, मी त्याच्याजवळ जाईल,’ असे राखीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. गत 29 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते. लग्नाची बातमी लपवून ठेवण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये लग्न केले गेले होते.