...म्हणून इंडस्ट्रीतील लोक करतात ड्रग्सचं सेवन, राखी सावंतचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 12:01 PM2020-09-25T12:01:21+5:302020-09-25T12:10:21+5:30

राखीने सांगितले की, अनेक लोक स्वत:ला स्लीम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स घेतात. पण हा प्रकार केवळ इंडस्ट्रीत नाही तर देशभरात असल्याचेही ती म्हणाली.

Rakhi Sawant revealed actors take drugs to maintain glamour | ...म्हणून इंडस्ट्रीतील लोक करतात ड्रग्सचं सेवन, राखी सावंतचा अजब दावा

...म्हणून इंडस्ट्रीतील लोक करतात ड्रग्सचं सेवन, राखी सावंतचा अजब दावा

googlenewsNext

बॉलिवूडमधील ड्रग्स मुद्द्याची आता सगळीकडेच चर्चा होत आहे. यावर कंट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. राखीनुसार, अनेक कलाकार हे भूक लागू नये म्हणून ड्रग्स घेतात. राखीने सांगितले की, अनेक लोक स्वत:ला स्लीम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स घेतात. पण हा प्रकार केवळ इंडस्ट्रीत नाही तर देशभरात असल्याचेही ती म्हणाली.

दैनिक भास्करला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राखी सावंत अजबच दावा केलाय की, मी इंडस्ट्रीत १५ वर्षांपासून आहे. मी पाहिलंय मग ते अभिनेते असो वा अभिनेत्री स्वत:चं ग्लॅमर कायम ठेवण्यासाठी ड्रग्स घेतात. काही लोक नशेसाठी या ड्रग्सचा वापर करतात. पण जास्तीत जास्त लोक त्यांचं ग्लॅमर हरवू नये म्हणून ड्रग्स घेतात. 

जास्त कोणतं ड्रग घेतात?

राखीने सांगितले की, जास्तीत जास्त कलाकार हे वीड हे ड्रग घेतात. याने त्यांना भूक लागत नाही. मुली सडपातळ असतात ज्यामुळे त्यांना अनेक प्रोजेक्ट्स मिळतात. अनेक अभिनेत्रींवर त्यांचं वजन वाढू नये याचं प्रेशर असतं. त्यांना भीती असते की, त्यांचं वजन वाढलं तर त्यांना काम मिळणार नाही. ज्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये जातात. आपली भूक दूर करण्यासाठी हे लोक ड्रग्सचा वापर करतात.

'मलाही वीड आणि हॅशचा सल्ला दिला गेला होता'

काही वर्षांपूर्वी मी सुद्धा माझ्या वजनाने हैराण होती. मला समजत नव्हतं की, माझं इतकं वजन का वाढत आहे. त्यावेळी मलाही वीड आणि हॅश घेण्याचा सल्ला दिला गेला होता. मला सांगण्यात आले होते की, हे ड्रग सामान्य आहे. जास्त लोक हेच घेतात स्लीम-ट्रिम राहण्यासाठी. पण मी याबाबत कम्फर्टेबल नव्हती. वीड आणि हॅशऐवजी मी हॉट योगाची निवड केली. असे अनेक कलाकार आहे ज्यांना एक्सरसाइज करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे हे लोक शॉर्टकट घेतात जो पूर्णपणे चुकीचा आहे.

...म्हणून घेतात लोक ड्रग्स

यात जराही शंका नाही की, लोक ड्रग्स बॉडी फॅट कटर, डिप्रेशन कटर म्हणून वापरतात. इंडस्ट्रीत फार स्पर्धा आहे. या प्रेशरमध्येही लोक ड्रग्स घेतात. जेणेकरून ते टिकून रहावे.

बाबो! कंगना रणौत आणि महेश भट्टच्या 'त्या' व्हायरल फोटोने खळबळ, राखी सावंत म्हणाली.....

कोण आहे ड्रग्स केसमध्ये नाव आलेली सिमोन खंबाटा? जी आहे NCB च्या रडारवर...

राखी सावंतची 'सटकली', कंगनाला भिकारी म्हणाली... पाहा व्हिडीओ

VIDEO : कंगनावर राखी सावंतने केली टीका, लोक म्हणाले - तुझं डोकं ठिकाणावर नाही'

Web Title: Rakhi Sawant revealed actors take drugs to maintain glamour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.