​राखी सावंत पुन्हा बरळली.... म्हणे,मोदींनी सिलींग फॅनवर बंदी आणावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 17:01 IST2016-04-06T00:01:28+5:302016-04-05T17:01:28+5:30

राखी सावंत कधी काय बोलेल याचा नेम नाही...प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर राखी पुन्हा मीडियात चर्चेत आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर लगेच ...

Rakhi Sawant reappears .... I say, Modi should ban the ceiling fan | ​राखी सावंत पुन्हा बरळली.... म्हणे,मोदींनी सिलींग फॅनवर बंदी आणावी

​राखी सावंत पुन्हा बरळली.... म्हणे,मोदींनी सिलींग फॅनवर बंदी आणावी

खी सावंत कधी काय बोलेल याचा नेम नाही...प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर राखी पुन्हा मीडियात चर्चेत आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर लगेच राखी मीडियाच्या कॅमेºयासमोर बाईट देताना दिसली...आता तिने मुंबईच्या ओशीवरा पोलिस ठाण्याबाहेर पत्रपरिषद घेऊन, प्रत्युषाच्या आत्महत्येप्रकरणी अनेक खुलासे केले. प्रत्युषा ही तिचा बॉयफ्रेन्ड राहुल राज सिंह याच्या कथितएक्स-वाईफमुळे धक्क्यात होती. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. राहुलची कथित एक्स वाईफ सलोनी हिने प्रत्युषाला काही व्हिडिओ पाठवले होते. प्रत्युषाच्या मृत्यूपूर्वी तिला हे व्हिडिओ मिळाले होते. प्रत्युषाच्या मानेवर जखमा होत्या. यावरून तिचा शारिरीक छळ झाल्याचे सिद्ध होते,असा दावा राखीने केला आहे. केवळ एवढेच नाही, तर यावेळी तिने एक अजबगजब मागणीही करून टाकली. देशातील आत्महत्येसाठी सिलींग फॅन जबाबदार आहेत. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलींग फॅनवर बंदी आणावी,अशी मागणी तिने केली...व्वा, राखी..तू आणि तुझे ज्ञान...सर्वच अचाट...मान गयें !!1

पत्रपरिषदेत राखीने खालील दावे केले
ती म्हणाली,
-अगर सच्चा प्यार करता था तो मोबाईल लेकर क्यों भाग गया और अब मीडिया के सामने रो रहा है.
- हमारे हाथ एक व्हिडिओ लगा है, जो हम क्राईम ब्रँच के पास देंगे और सब सामने आ जायेगा
- वो व्हिडिओ ही सबूत है, इससे ही सब कुछ सामने आ जायेगा
- सरकार प्रत्युषा के फॅमिली को मुआवजा दे, कमसे कम ५ करोड.
-आप लोग हिंदुस्तान की बेटी को सपोर्ट किजीये.
- मैं देश की बेटी हू और देश की सेवा करना चाहती हूं.
 
 

Web Title: Rakhi Sawant reappears .... I say, Modi should ban the ceiling fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.