चुकून का होईना राखी सावंतने शेअर केला नव-याचा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 13:54 IST2019-08-16T13:44:45+5:302019-08-16T13:54:39+5:30

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या जाम चर्चेत आहेत. राखीने अलीकडेच एका एनआरआयशी गूपचूप लग्न केले. पण अद्याप राखीचा पती दिसतो कसा, हे मात्र कळायला मार्ग नाही.

rakhi sawant mistakenly shared her husband pictures during honeymoon | चुकून का होईना राखी सावंतने शेअर केला नव-याचा फोटो!!

चुकून का होईना राखी सावंतने शेअर केला नव-याचा फोटो!!

ठळक मुद्देराखीने पतीचा एकही फोटो शेअर न केल्याने हे लग्नही तिचा एक ड्रामा असावा, असा अनेकांचा समज झाला होता. अद्यापही राखीने लग्न केले, हे मानायला लोक तयार नाहीत.

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या जाम चर्चेत आहेत. राखीने अलीकडेच एका एनआरआयशी गूपचूप लग्न केले. आधी लग्नाची बातमी तिने नाकारली आणि नंतर होय, मी लग्न केले, अशी कबुली दिली. तिच्या पतीचे नाव रितेश आहे, हेही तिने सांगितले. पण अद्याप राखीचा पती दिसतो कसा, हे मात्र कळायला मार्ग नाही. कारण राखीने अद्याप त्याचा एकही फोटो शेअर केलेला नाही. पण अलीकडे राखीने तिचे हनीमुनचे फोटो शेअर केले आणि चुकून का होईना या फोटोत राखीच्या नव-याची एक झलक दिसली.


होय, या फोटोत राखीच्या डोळ्यांवर काळा गॉगल आहे. हा फोटो जरा झूम करून बघितला असता, यात राखीच्या गॉगलमध्ये तिचा नवरा दिसतोय.

राखीचे फोटो घेत असतानाची त्याची छबी राखीच्या गॉगलमध्ये कैद झाली आहे. अर्थात यात त्याचा चेहरा दिसत नाही. पण हाच राखीचा पती असावा, असा अंदाज मात्र काढला जातोय. हा फोटो शेअर करताना ‘माझे हनीमून पिक्चर्स, माझा नवरा बेस्ट नवरा आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करते,’ असे तिने लिहिले आहे.


राखीने पतीचा एकही फोटो शेअर न केल्याने हे लग्नही तिचा एक ड्रामा असावा, असा अनेकांचा समज झाला होता. अद्यापही राखीने लग्न केले, हे मानायला लोक तयार नाहीत. पण कदाचित राखीचे लग्न झालेय आणि राखी म्हणते त्याप्रमाणे, तिच्या पतीला मीडियासमोर यायचे नाही.
माझा पती एनआरआय आहे. त्याचे नाव रितेश आहे आणि तो युकेचा आहे. लग्नानंतर तो लगेच परत गेला. माझ्या व्हिसाची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाली की, मी त्याच्याजवळ जाईल,’ असे राखीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. गत 29 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते. लग्नाची बातमी लपवून ठेवण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये लग्न केले गेले होते.

Web Title: rakhi sawant mistakenly shared her husband pictures during honeymoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.