Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 13:47 IST2024-05-18T13:23:40+5:302024-05-18T13:47:43+5:30
Rakhi Sawant : राखीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर असलेली पाहायला मिळत आहे.

Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
ड्रामा क्वीन राखी सावंतचा त्रास वाढत आहे. राखीला गेल्या काही दिवसांपासून वेदना होत असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या पोटामध्ये 10 सेंटीमीटरचा ट्यूमर असल्याचं म्हटलं जात आहे. काही रिपोर्ट्समध्ये राखीला हृदयासंबंधित समस्या असल्याचंही सांगण्यात आलं होतं. रुग्णालयात असताना राखीने स्वत: तिच्या हेल्थविषय़ी अपडेट देत व्हिडीओ शेअर केला आहे.
राखीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर असलेली पाहायला मिळत आहे. तिच्या हातात फोन असून ती सेल्फी व्हिडीओ काढत आहे. "हॅलो माझ्या मित्रांनो, मी बाहेर जाणं, फिरणं हे खूप मिस करत आहे. मी रुग्णालयात आहे. माझी सर्जरी आहे. मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येत आहे. मी हा कसा ड्रेस घातला आहे. मला असे वाईट कपडे घालण्याची सवय नाही. तुम्हाला समजतंय ना, हा रुग्णालयाचा ड्रेस चांगला दिसत नाही. मला लवकर बरं होऊन परत यायचं आहे. मला खूप मजा करायची आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा" असं राखीने म्हटलं आहे.
राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर लोकांनी ती हे सर्व नाटक करत आहे. तिला काहीही झालेलं नाही असं म्हटलं आहे. तसेच एकाने राखी एक ड्रामा क्वीन असल्याचं सांगितलं. तिला फक्त नाटक करायला येतं, त्यासाठी ती काहीही करू शकते असं युजरने म्हटलं. 14 मे रोजी हॉस्पिटलमधूनराखी सावंतचे फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती रुग्णालयाच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली होती.
"आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'"
राखीचा एक्स बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी याने राखी सावंतच्या आजाराला 'ढोंग' म्हटलं आहे. त्याने तिच्या कॅन्सर आणि हार्ट प्रॉब्लेमची पोलखोल केली आहे. अभिनेत्री आणि 'बिग बॉस'ची एक्स कंटेस्टेंट राखी सावंतला छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुधवारी तिचा पहिला पती रितेश कुमार आणि तिच्या भावाने हेल्थ अपडेट दिले होते. याच दरम्यान, सरेंडरची तारीख जवळ येत असल्याने राखी हे नाटक करत असल्याचा दावा आदिल खान दुर्रानीने केला आहे.