किसिंग सीनसाठी राखी सावंतला घ्यावे लागले ५५ रिटेक; मिका सिंगची आली आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 21:15 IST2018-02-04T15:45:02+5:302018-02-04T21:15:02+5:30

आयटम गर्ल राखी सावंत नेहमीच तिच्या बोल्ड फोटो आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. २००७ मध्ये गायक मिका सिंग याने ...

Rakhi Sawant has to take 55 rite for the kissing scene; Mika Singh remembered! | किसिंग सीनसाठी राखी सावंतला घ्यावे लागले ५५ रिटेक; मिका सिंगची आली आठवण!

किसिंग सीनसाठी राखी सावंतला घ्यावे लागले ५५ रिटेक; मिका सिंगची आली आठवण!

टम गर्ल राखी सावंत नेहमीच तिच्या बोल्ड फोटो आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. २००७ मध्ये गायक मिका सिंग याने तिला बळजबरीने लिपलॉक केले होते, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. यावर त्याकाळी खूप वादही निर्माण झाला होता. राखीने मिकावर नको नको ते आरोप केले होते. मात्र ही घटना अजूनही राखी विसरली नसावी, असेच काहीसे दिसत आहे. होय, राखीला आॅनस्क्रीन किस करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. किस देण्यासाठी तिला एक-दोन नव्हे तर तब्बल ५५ रिटेक घ्यावे लागले. 



राखी तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करीत होती. शूटिंग करतानाचा एक अनुभव सांगताना राखीने म्हटले की, ‘किसिंग सीन देताना मी काहीशी अस्वस्थ झाली होती. मला मिका सिंग आठवत होता.’ राखीला हा सीन करताना तब्बल ५५ रिटेक्स घ्यावे लागले. याविषयी सांगताना राखीने म्हटले की, ‘हा सीन करताना मला सातत्याने मिका सिंगची आठवण येत होती. ती घटना मला सातत्याने आठवत होती. मी घाबरली होती. असे वाटत होते की, कोणीतरी माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मला असे अजिबातच वाटत नव्हते की, मी कॅमेºयासमोर अ‍ॅक्टिंग करीत आहे. मला असे वाटत होते की, हे सर्व काही पुन्हा एकदा माझ्यासोबत घडत आहे.’



आपल्या पहिल्या किसिंग सीनबद्दल बोलताना राखीने म्हटले की, ‘या सीनची शूटिंग करताना मी खूप टेन्शनमध्ये होती. मी हे यापूर्वी कधीच केले नव्हते त्यामुळे मी अस्वस्थ झाली होती. त्यामुळे मला दारूची अर्धी बाटली प्यावी लागली. चित्रपटात ड्रग अ‍ॅडिक्टची भूमिका साकारत असलेल्या राखीच्या मते, मला माहिती नव्हते की, चित्रपटात किसिंग सीनदेखील आहे. मात्र ही कॅरेक्टरची डिमांड आहे. जेव्हा मी हा सीन करण्यास नकार दिला तेव्हा निर्मात्यांनी म्हटले की, तुला तो सीन करावाच लागेल.’

Web Title: Rakhi Sawant has to take 55 rite for the kissing scene; Mika Singh remembered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.