राखी सावंतने सलमान खानसाठी शोधली पाकिस्तानी वधू, म्हणाली - "मला वहिनी मिळाली..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:22 IST2025-02-27T17:21:10+5:302025-02-27T17:22:25+5:30

Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अभिनयापेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता राखी सावंतने बॉलिवूडच्या भाईजानसाठी वधू शोधली आहे, जी पाकिस्तानातील आहे.

Rakhi Sawant found a Pakistani bride for Salman Khan, said - ''I found a sister-in-law...'' | राखी सावंतने सलमान खानसाठी शोधली पाकिस्तानी वधू, म्हणाली - "मला वहिनी मिळाली..."

राखी सावंतने सलमान खानसाठी शोधली पाकिस्तानी वधू, म्हणाली - "मला वहिनी मिळाली..."

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अभिनयापेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. ती बिग बॉसच्या घरात दोनदा दाखल झाली होती. ती सलमान खानला तिचा भाऊ मानते. बी टाउनमधील सर्वात चर्चित बॅचलर सलमान खानच्या चाहत्याने त्याने लवकरात लवकर लग्न करावे असे वाटत आहे. दरम्यान आता राखी सावंतने बॉलिवूडच्या भाईजानसाठी वधू शोधली आहे, जी पाकिस्तानातील आहे. 

ड्रामा क्वीन राखी सावंतने सलमान खानसाठी वधू शोधल्याचा दावा केला आहे. राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राखी म्हणताना ऐकू येते की, 'सलमान भाई, मला माझी वहिनी सापडली आहे. सलमान माझा भाऊ आहे आणि वहिनी पाकिस्तानातून येणार आहे. राखीने पुढे सांगितले की, माझी इच्छा आहे की हानियाने यावे आणि बॉलिवूडमध्ये सलमान खानसोबत काम करावे. हानिया माझी बहिण आहे. मी कित्येक मुलाखतीत म्हटलंय की, हानियाने बॉलिवूडमध्ये सलमान सोबत काम करावे. आता ते दिवस फार दूर नाहीत. जेव्हा हानिया सिनेमात सलमानची हिरोईन बनेल. बजरंगी भाईजानसारखी एक सुंदर लव्हस्टोरी बनेल. सलमान माझा भाऊ आणि वहिनी हानिया पाकिस्तानमधून. त्यानंतर हसत अभिनेत्री म्हणाली की, मी सिनेमात वहिनी बनण्याबद्दल बोलत आहे. जर खऱ्या आयुष्यातही असे होत असेल तर मला काहीच अडचण नाही.


राखी आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर
सोशल मीडिया युजर्सला राखी सावंतचा प्रस्ताव जराही आवडला नाही. जास्त लोकांनी तिला ट्रोल केले. एका युजरने लिहिले की, राखी फक्त बकवासच करु शकते. दुसऱ्या युजरने म्हटले, बजरंगी भाईजान २मध्ये हानिया मुन्नीची भूमिका करू शकते. कारण ती सलमानसाठी त्याच्या मुलीच्या वयाची आहे. याशिवाय जास्त युजर्सने नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Rakhi Sawant found a Pakistani bride for Salman Khan, said - ''I found a sister-in-law...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.