तेरे ड्रिम में मेरी एंट्री...! राखी सावंतसोबत रिक्षावाले काकाही झाले ‘झिंगाट’; भररस्त्यावर भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 15:57 IST2021-06-21T15:56:55+5:302021-06-21T15:57:13+5:30
Rakhi Sawant Dance Video : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कधी काय करेल, याचा नेम नाही. या ना त्या कारणानं ही ड्रामा क्वीन सतत चर्चेत असते. आता काय, तर बयेने रिक्षावाल्या काकालाच भर रस्त्यावर नाचवलं.

तेरे ड्रिम में मेरी एंट्री...! राखी सावंतसोबत रिक्षावाले काकाही झाले ‘झिंगाट’; भररस्त्यावर भन्नाट डान्स
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कधी काय करेल, याचा नेम नाही. या ना त्या कारणानं ही ड्रामा क्वीन सतत चर्चेत असते. आता काय, तर बयेने रिक्षावाल्या काकालाच भर रस्त्यावर नाचवलं. होय, राखीचा मुंबईच्या रस्त्यावरचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. यात राखी चक्क रस्त्यावर एका रिक्षाचालकाला डान्स शिकवताना दिसतेय. रिक्षावाला काकाही मस्त एन्जॉय करतोय. (Rakhi Sawant Dance Video )
राखीचा हा व्हिडीओ तिच्या गाण्याच्या प्रमोशनचा आहे. अलीकडे राखीचा ‘तेरे ड्रिम में मेरी एंट्री’ हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. या गाण्यात राखी अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसली. गाणं रिलीज झाल्यापासून आत्तापर्यंत लाखो लोकांनी ते पाहिलं आहे. राखीने यात दमदार डान्स केला आहे.
राखीचं हे गाणं युट्यूबवर व्हायरल होतंय. 18 व्या स्थानावर ट्रेंड करतंय. साहजिकच राखी जाम खूश आहे. कदाचित याच आनंदात रिक्षावाल्या काकांना तिने नाचायला भाग पाडलं. गेल्या काही दिवसांपासून पापाराझींसोबतचे राखीचे व्हिडीओ चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वजन खूप वाढल्याने ते घटवण्यासाठी राखी फिटनेस सेंटरमध्ये घाम गाळतेय. तिने काही दिवसांपूर्वी योगा करतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या व्हिडिओमुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वीच राखी ‘बिग बॉस 14’ मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातही राखीने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. बिग बॉसमधून ती 14 लाखांची रक्कम घेऊन बाहेर पडली होती.