Rakhi Sawant : 'आदिलची बॅण्ड वाजवेन...', अमेरिकेतून भारतात परतलेल्या या अभिनेत्रीचा राखी सावंतला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 15:09 IST2023-02-25T15:07:51+5:302023-02-25T15:09:31+5:30
Rakhi Sawant : आत्तापर्यंत राखी सावंत ही लढाई एकटी आदिल खानसोबत लढत होती, पण आता तिला इंडस्ट्रीतून खूप पाठिंबा मिळत आहे. शर्लिन चोप्रानंतर आता आणखी एक अभिनेत्री राखीच्या पाठीशी उभी आहे.

Rakhi Sawant : 'आदिलची बॅण्ड वाजवेन...', अमेरिकेतून भारतात परतलेल्या या अभिनेत्रीचा राखी सावंतला पाठिंबा
राखी सावंत(Rakhi Sawant)ला इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन म्हटलं जातं, याच कारणामुळे जेव्हा तिच्या आदिल खानसोबतच्या वादाची बातमी आली तेव्हा सगळ्यांना वाटलं की कदाचित ती पुन्हा एकदा नौटंकी करत आहे. मात्र आदिलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हे प्रकरण किती गंभीर आहे हे समजले. तेव्हापासून आजतागायत राखी न्यायासाठी लढत आहे. सुरुवातीला जरी ती एकटीच उभी दिसली, पण आता तिला इंडस्ट्रीतूनही पाठिंबा मिळू लागला आहे. या लढाईत सर्वप्रथम शर्लिन चोप्राने राखीला पाठिंबा दिला होता, तर आता काश्मिरा शाहदेखील तिच्या बाजूने उभी राहिली आहे.
कश्मिरा शाह शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईत स्पॉट झाली होती, जिथे ती पापाराझींना भेटली. त्यावेळी काश्मिराने स्पष्ट केले होते की, राखीची आई वारली तेव्हा ती अमेरिकेत होती आणि एक दिवस आधी परतली होती, त्यामुळे आता ती राखीला पूर्ण पाठिंबा देणार आहे आणि आदिलची बँड वाजवायला तयार आहे. राखीसोबत घडलेल्या या सर्व प्रकारावर आश्चर्य व्यक्त करत ती म्हणाला की, हे काय झाले.
शर्लिन देखील राखीला खूप सपोर्ट करताना दिसत आहे, या वाईट काळात ती तिच्यासोबत उभी असल्याचे पाहायला मिळाले. तिथे आदिल खानबद्दल बोलताना त्याचे सत्य वेळोवेळी समोर येत आहे. गेल्या वर्षीच त्याचे नाव चर्चेत आले जेव्हा तो राखीसोबत सगळीकडे दिसला. हळूहळू ते एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले. या वर्षी जानेवारीमध्ये राखीने खुलासा केला होता की, दोघांनी ७ महिन्यांपूर्वी लग्न केले होते, मात्र आदिलने हे सत्य लपवण्यास सांगितले होते. यानंतर आदिलचा लग्नाला नकार, नंतर कबुली जबाब, दोघांमध्ये भांडण, राखीच्या आईचा मृत्यू आणि त्यानंतर आदिलची कोठडी. हे सर्व एकामागून एक घडले आणि आज तो तुरुंगात आहे, त्यामुळे राखी न्यायासाठी लढत आहे.