राजश्री प्रॉडक्शनचे एमडी रज्जत बडजात्या यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 09:13 IST2016-07-30T03:43:33+5:302016-07-30T09:13:33+5:30
राजश्री प्रॉडक्शनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रज्जत बडजात्या यांचं शुक्रवारी कॅन्सरनं निधन झालं. रज्जत बडजात्या यांना कॅन्सर ...

राजश्री प्रॉडक्शनचे एमडी रज्जत बडजात्या यांचं निधन
र जश्री प्रॉडक्शनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रज्जत बडजात्या यांचं शुक्रवारी कॅन्सरनं निधन झालं.
रज्जत बडजात्या यांना कॅन्सर झाल्याचं निदान गेल्या तीन महिन्यापूर्वी डॉक्टरांनी केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
रज्जत बडजात्या हे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे चुलत बंधू होते. बॉलिवूडमधील चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील सर्वात मोठे प्रॉडक्शन हाऊस म्हणून राजश्री प्रॉडक्शनकडे पाहिले जाते. रज्जत बडजात्या यांच्या निधनाची बातमी समजताच अभिनेता सलमान खानसह कलाश्रेत्रातील अनेक मंडळींनी शोक व्यक्त केला.
दरम्यान, रज्जत बडजात्या यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.