"जेव्हा राजपाल पैसे देत होता तेव्हा त्यांनी घेतले नाहीत...", राजपाल यादवच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया, अभिनेत्याने किती रक्कम परत केली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:16 IST2026-02-13T11:15:54+5:302026-02-13T11:16:09+5:30
९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरूंगात आहे. नुकत्याच झालेल्या जामीनाच्या सुनावणीत कोर्टाने राजपाल यादवला दिलासा दिलेला नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर राजपाल यादवचे वकील भाष्कर उपाध्याय यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"जेव्हा राजपाल पैसे देत होता तेव्हा त्यांनी घेतले नाहीत...", राजपाल यादवच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया, अभिनेत्याने किती रक्कम परत केली?
९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरूंगात आहे. "माझ्याकडे खरंच पैसे नाहीत" असं म्हणत काही दिवसांपूर्वीच राजपालने सरेंडर केलं. याप्रकरणी सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. नुकत्याच झालेल्या जामीनाच्या सुनावणीत कोर्टाने राजपाल यादवला दिलासा दिलेला नाही. पुढील सुनावणी होईपर्यंत त्याला आणखी काही दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर राजपाल यादवचे वकील भाष्कर उपाध्याय यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'अता पता लापता' या सिनेमासाठी राजपाल यादवने ५ कोटी घेतले होते. व्याजासहित आत्तापर्यंत ही रक्कम ९ कोटी इतकी झाली आहे. सिनेमा फ्लॉप झाल्याने राजपालला मोठं नुकसान झालं. पण, यापैकी अर्धी रक्कम परत केल्याचा दावा राजपालच्या वकिलांनी केला आहे. अभिनेत्याचे वकील भाष्कर उपाध्याय म्हणाले, "पाच कोटींपैकी अडीच कोटी रुपये परत केले आहेत. सोमवारी या प्रकरणात अंतिम सुनावणी होईल. इन्व्हेसमेंट म्हणून घेतलेले ५ कोटी रुपये परत करण्यास राजपाल यादवने कधीच नाही म्हटलेलं नाही. पण सुरुवातीला पैसे जेव्हा राजपालने पैसे द्यायचं ठरवलं तेव्हा कंपनीने ते घेण्यास नकार दिला होता".
"२०१२ मध्ये झालेल्या अॅग्रीमेंटच्या आधारावर हा खटला सुरू आहे. या प्रकरणात राजपाल यादवने आधीच तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे. राजपाल यादवला पैसे कोणी दिले हे सांगू शकत नाही. कारण हा कौंटुबिक विषय आहे", असंही त्यांनी सांगितलं. राजपाल यादवच्या भावाच्या मुलीचं फेब्रुवारी महिन्यात लग्न आहे. यासाठी राजपाल यादवने जामीनासाठी अर्ज केला होता. ज्याची पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीला होणार आहे.