"त्याच्या पत्नीने मेसेज केले, मी इमोशनल होऊन...", राजपाल यादवला पैसे दिलेल्या बिजनेसमॅनची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:23 IST2026-02-17T13:21:38+5:302026-02-17T13:23:27+5:30
'अता पला लापता' या सिनेमासाठी राजपाल यादवने एका व्यावसायिकाकडून ५ कोटी घेतले होते. पण सिनेमा फ्लॉप झाल्याने त्याला नुकसान झालं आणि त्यामुळे राजपाल हे पैसे परत करू शकला नाही. ज्या व्यावसायिकाने राजपालला पैसे दिले होते त्या माधव गोपाल अग्रवाल यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

"त्याच्या पत्नीने मेसेज केले, मी इमोशनल होऊन...", राजपाल यादवला पैसे दिलेल्या बिजनेसमॅनची प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला ९ कोटी चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपू्र्वी अभिनेत्याने याप्रकरणी "माझ्याकडे खरंच पैसे नाहीत", असं म्हणत तिहार तुरुंगात सरेंडर केलं होतं. 'अता पला लापता' या सिनेमासाठी राजपाल यादवने एका व्यावसायिकाकडून ५ कोटी घेतले होते. पण सिनेमा फ्लॉप झाल्याने त्याला नुकसान झालं आणि त्यामुळे राजपाल हे पैसे परत करू शकला नाही. ज्या व्यावसायिकाने राजपालला पैसे दिले होते त्या माधव गोपाल अग्रवाल यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूज पिंचशी बोलताना माधव अग्रवाल म्हणाले की मिथिलेश कुमार कठेरिया यांनी त्यांची ओळख राजपाल यादवशी करून दिली होती. "राजपाल म्हणाला की आमचा अता पता लापता हा सिनेमा अर्धा झाला आहे. पण जर पैसे नाही मिळाले तर आम्ही बरबाद होऊ. सुरुवातीला मी पैसे द्यायला नकार दिला होता. पण त्यानंतर त्याच्या पत्नीने मला मेसेज केला होता. यामुळे मी इमोशनल होऊन राजपालला पैसे दिले. तेव्हा आम्ही अॅग्रीमेंटही केली होती. त्यामध्ये असं लिहिलं होतं की सिनेमा फ्लॉप होवो किंवा हिट, सेन्सॉर बोर्डचं सर्टिफिकेट मिळो या न मिळो...त्याच्याशी काहीच घेणं देणं नसेल. पण पैसे ठरलेल्या वेळेलाच परत मिळतील", असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "राजपाल यादव म्हणाला की मी सिनेमात इन्वेस्ट केलं होतं. मात्र जेव्हा तुम्ही इन्वेस्ट करता तेव्हा पर्सनल गॅरंटी दिली जात नाही. राजपालने पर्सनल गॅरंटीही दिली आणि त्याने चेकही दिले. अॅग्रीमेंटनुसार राजपाल यादवला आम्हाला जास्त पैसे द्यायचे होते. पण दिल्ली हायकोर्टने हस्तक्षेप केल्याने १०.४० कोटी ही रक्कम आम्ही मान्य केली. पण राजपालने दिलेले सगळे चेक बाऊन्स झाले. जेव्हा हा विषय कोर्टात गेला नव्हता तेव्हा मी त्यांच्या घरी जाऊन पैसे मिळावे म्हणून रडलो होतो. आम्ही एवढी पैसेवाले लोक नाही आहोत. अभिनेता आहे त्यामुळे पैसे मिळतील असं वाटलं होतं. म्हणून आम्ही त्यांची मदत केली होती. आम्ही व्यावसायिक आहोत त्यामुळे आम्हाला पैसे लागतात. पण कोर्टाची अशी प्रकिया आहे आपण काहीच करू शकत नाही".