राजकुमार रावचा 'गन्स अँड गुलाब्स'मधील नव्वदच्या दशकातील अवतार ठरला चर्चेचा विषय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 19:34 IST2023-08-02T19:33:34+5:302023-08-02T19:34:50+5:30
Rajkumar Rao : 'गन्स अँड गुलाब्स'मध्ये राजकुमार राव एका नव्या अवतारात पाहायला मिळत आहे.

राजकुमार रावचा 'गन्स अँड गुलाब्स'मधील नव्वदच्या दशकातील अवतार ठरला चर्चेचा विषय!
राजकुमार राव हा अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि त्याने साकारलेल्या पात्रांना पूर्णपणे न्याय देऊन नेहमीच या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. 'गन्स अँड गुलाब्स'मध्ये त्याच्या हटके कॉमेडी थ्रिलरमध्ये राजकुमार एका नव्या अवतारात पाहायला मिळत आहे. त्याच्या या लूकची चर्चा तर होत आहे. तसेच त्याच्या या भूमिकेसाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत.
'गन्स अँड गुलाब्स' या बहुप्रतिक्षित सीरिजचा ट्रेलर लाँच झाला असून एक उत्तम कॉमेडी बघायला मिळणार असल्याचा चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. राज आणि डीके दिग्दर्शित या आगामी कॉमेडी थ्रिलरसाठी चाहते उत्सुक आहेत. दुलकर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशन सोबत अविश्वसनीय प्रतिभावान राजकुमार राव यांच्या भूमिका यात अनुभवयाला मिळणार आहेत.
नव्वदच्या दशकात सेट केलेली ही थरारक अॅक्शन आणि विनोदाच्या रोलर-कोस्टर राइड असलेली कॉमेडी असणार आहे या सगळ्यात एक विषय चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राजकुमार रावचा नवीन लूक ! जाड केस, एक चकचकीत जाकीट, आणि एक विनोदी स्वभाव जो अप्रतिम आहे. समीक्षकांच्या प्रशंसनीय कामगिरीपासून ते बॉक्स ऑफिसच्या यशापर्यंत राजकुमार राव यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका हटके होत्या. पॉवरहाऊस अभिनेता आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी तयार होताना दिसतोय.