मधुचंद्राची सीडी चोरीला... राजकुमार-तृप्तीची केमिस्ट्री, तर मल्लिका शेरावतचं दमदार कमबॅक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:06 IST2024-09-12T17:05:13+5:302024-09-12T17:06:27+5:30
विशेष म्हणजे या सिनेमातून अभिनेत्री मल्लिका शेरावत कमबॅक करतेय.

मधुचंद्राची सीडी चोरीला... राजकुमार-तृप्तीची केमिस्ट्री, तर मल्लिका शेरावतचं दमदार कमबॅक!
Vicky Vidya Ka Woh Wala Video Trailer : 'स्त्री 2' नंतर अभिनेता राजकुमार राव पुन्हा एक धमाकेदार सिनेमा घेऊन येतोय. नॅशनल क्रश तृप्ती डिमरीसोबत तो 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रेक्षकांना रोमान्स, ड्रामा आणि कॉमेडीचा पुरेपूर डोस या सिनेमात पाहायाला मिळणार असल्याचं ट्रेलरवरुन स्पष्ट झालं आहे.
सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात ही राजकुमार राव (विकी) आणि तृप्ती डिमरी (विद्या) यांच्या लग्नाच्या फोटोशूटने सुरू होतो. यानंतर त्यांच्या मधुचंद्राची रात्र दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये विकी विद्याला म्हणतो की हॉलिवूडच्या कपल्सप्रमाणे आपण लग्नाच्या रात्रीचा व्हिडीओ बनवू. नंतर या व्हिडीओची सीडी चोरीला जाते आणि इथूनच खऱ्या कथेची सुरुवात होते.
3 मिनिटे 32 सेंकदाच्या या ट्रेलरमध्ये दमदार संवाद आणि गाणे ऐकू येत आहेत. हा मसालेदार चित्रपट असून प्रेक्षकांना 90 च्या दशकातल्या जादुई युगात घेऊन जाईल. विशेष म्हणजे या सिनेमातून अभिनेत्री मल्लिका शेरावत कमबॅक करतेय. तिची खास भुमिका या सिनेमात आहे. तर ट्रेलरमध्ये अभिनेत्री शहनाज गिलची झलक पाहायला मिळतेय.
'ड्रिम गर्ल' फ्रँचायझीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ'चे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. या चित्रपटात विजय राज, मस्त अली, अर्चना पूरण सिंग, मुकेश तिवारी, अर्चना पटेल, राकेश बेदी, टिकू तलसानिया आणि अश्विनी काळसेकर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस पडेल की नाही हे येणार्या काळातच कळेल. मात्र, या चित्रपटाच्या नावाचीच सध्या चर्चा सुरू आहे.