अभिनेत्यानं सुरू केलं सौरव गांगुलीच्या बायोपीकचं शूटिंग; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:24 IST2026-04-02T14:13:44+5:302026-04-02T14:24:25+5:30

क्रिकेटचा 'दादा' सौरव गांगुलीचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.

Rajkummar Rao Sourav Ganguly Biopic Shooting Starts | अभिनेत्यानं सुरू केलं सौरव गांगुलीच्या बायोपीकचं शूटिंग; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

अभिनेत्यानं सुरू केलं सौरव गांगुलीच्या बायोपीकचं शूटिंग; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

बॉलिवूडमध्ये विविध खेळांवर तसंच खेळाडुंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आले आहेत.  आजवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी बहुतांश चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याचं दिसून आलं आहे. आता क्रिकेटचा 'दादा' सौरव गांगुलीचं आयुष्य (Sourav Ganguly Biopic) आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. या बायोपिकमध्ये बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिका साकारत आहे.

नुकतेच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. राजकुमार रावने बुधवारी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्याने लिहिले, "आणि सुरुवात झाली... एकमेव आणि अद्वितीय 'दादा'". या चित्रपटाची निर्मिती लव रंजन करत असून, 'उडान' फेम विक्रमादित्य मोटवाने या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.


राजकुमारच्या बिझी शेड्युलमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन २०२७ पर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकुमार राव सध्या एकामागून एक तगड्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. गांगुलीच्या बायोपीक व्यतिरिक्त तो प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित 'निकम' (Nikam) या चित्रपटातही दिसणार आहे. तसेच, अभिनेत्री कीर्ती सुरेशसोबतचा त्याचा 'रफ्तार' हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title : राजकुमार राव ने सौरव गांगुली की बायोपिक की शूटिंग शुरू की।

Web Summary : राजकुमार राव ने सौरव गांगुली की बायोपिक की शूटिंग शुरू कर दी है, जिसका निर्माण लव रंजन कर रहे हैं और निर्देशन विक्रमादित्य मोटवाने कर रहे हैं। राव की अन्य परियोजनाओं के कारण रिलीज 2027 तक बढ़ सकती है, जिसमें 'निकम' और 'रफ़्तार' शामिल हैं।

Web Title : Rajkummar Rao starts shooting for Sourav Ganguly biopic.

Web Summary : Rajkummar Rao has begun shooting for Sourav Ganguly's biopic, produced by Luv Ranjan and directed by Vikramaditya Motwane. Release may extend to 2027, due to Rao's other projects, including 'Nikam' and 'Raftar'.