Stree 2 Teaser : श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी 'स्त्री २'चा टीझर पाहिलात का? सोशल मीडियावर झाला लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 02:47 PM2024-06-16T14:47:46+5:302024-06-16T14:48:05+5:30

'स्त्री २'चा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rajkummar Rao & Shraddha Kapoor's horror comedy 'Stree 2' Teaser Leaked on social media | Stree 2 Teaser : श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी 'स्त्री २'चा टीझर पाहिलात का? सोशल मीडियावर झाला लीक

Stree 2 Teaser : श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी 'स्त्री २'चा टीझर पाहिलात का? सोशल मीडियावर झाला लीक

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'स्त्री 2' (Stree 2) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या टीझर 'मुंज्या' चित्रपटाच्या शोसोबत थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. टीझर सोशल मीडियावर रिलीज होण्यापूर्वीच ऑनलाईन लीक झाला.  हा टीझर थरारक पण तितकाच मजेशीर आहे. 

'स्त्री २'चा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  यामध्ये प्रेक्षकांना अभिनेत्री श्रद्धा कपूरशिवाय आणखी एका अभिनेत्रीची झलकही पाहायला मिळत आहे. 'स्त्री २'मध्ये तमन्ना भाटिया पाहायला मिळणार आहे. तिचा या चित्रपटामध्ये कॅमिओ आहे. टीझरमध्ये तिची झलक पाहायला मिळाली आहे. 

राजकुमार राव पुन्हा एकदा विकीच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  'हमने आपकी चोटी काट दी थी. गरम तेल से मसाज करेंगी तो फट से वापस आ जाएंगे. हम पलट रहे हैं.. बस आप हमारे कपड़े मत निकालना प्लीज.... हम दोस्त हैं ना.....', हा राजकुमार रावचा डायलॉग टीझरच्या शेवटी ऐकायला येतोय. 

'स्त्री 2' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक झाले आहेत. 'स्त्री २' चा टीझर पाहिल्यानंतर चित्रपटात हॉरर आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका बघायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.  'स्त्री' हा सिनेमा 2018 साली सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आताही 'स्त्री' बहुचर्चित सिनेमा तुमचा पाहायचा राहिला असेल तर तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता.  
 

Web Title: Rajkummar Rao & Shraddha Kapoor's horror comedy 'Stree 2' Teaser Leaked on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.