अभिनेता राजकुमार रावसोबत झाला फ्रॉड, त्याच्या पॅन कार्डवर घेण्यात आलं लोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 14:43 IST2022-04-02T14:38:55+5:302022-04-02T14:43:52+5:30

Rajkumar Rao : अभिनेत्याच्या पॅन कार्डवर कुणीतरी फसवणूक करून लोन घेतलं आहे. त्यानंतर राजकुमार रावने एका व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Rajkummar Rao reveals his pan card has been misused and small loan taken in his name | अभिनेता राजकुमार रावसोबत झाला फ्रॉड, त्याच्या पॅन कार्डवर घेण्यात आलं लोन

अभिनेता राजकुमार रावसोबत झाला फ्रॉड, त्याच्या पॅन कार्डवर घेण्यात आलं लोन

Rajkumar Rao :  अभिनेता राजकुमार राव आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखला जातो आणि सोशल मीडियावरही तो बराच अॅक्टिव असतो. पण त्याने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे सगळेच हैराण झाले. राजकुमार रावने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्याच्यासोबत फ्रॉड झाला आहे. अभिनेत्याच्या पॅन कार्डवर कुणीतरी फसवणूक करून लोन घेतलं आहे. त्यानंतर राजकुमार रावने एका व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे.

राजकुमार रावने सांगितलं की, त्याच्या पॅन कार्डचा दुरूपयोग करून कुणीतरी त्याच्या नावावर लोन घेतलं आहे. ज्यामुळे त्याचा क्रेडिट स्कोर प्रभावित झाला आहे. आता याबाबत त्याने ट्विटरवर पोस्ट करून क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना यााबाबत माहिती घेण्यास सांगितलं आहे.

राजकुमार रावने  आपल्या ट्विटमध्ये सांगितलं की, त्याच्या पॅन कार्डचा दुरूपयोग केला गेला आहे. 'माझ्या पॅन कार्डचा वापर करून माझ्या नावावर २५०० रूपयांचं एक छोटसं लोन घेण्यात आलं. ज्यामुळे माझा सिलिब स्कोर प्रभावित झाला आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेड कृपया हे बरोबर करा आणि या विरोधात कारवाई करा'. 

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर अभिनेता राजकुमार राव 'हिट', 'मोनिका', ओ माय डार्लिंग आणि भीड सिनेमात दिसणार आहे. सध्या या सिनेमाच्या रिलीज डेट समोर आलेल्या नाहीत. पण आशा आहे की, हे सिनेमे यावर्षीच रिलीज होतील.
 

Web Title: Rajkummar Rao reveals his pan card has been misused and small loan taken in his name