'या' मराठी चित्रपटासाठी राजकुमार रावची खास पोस्ट, पाठिंबा देत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 09:04 IST2025-09-17T09:03:35+5:302025-09-17T09:04:30+5:30
मराठी चित्रपटाला बॉलीवूडमधून पाठिंबा, अभिनेत्याची खास पोस्ट!

'या' मराठी चित्रपटासाठी राजकुमार रावची खास पोस्ट, पाठिंबा देत म्हणाला...
Rajkummar Rao : राजकुमार राव हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. राजकुमार राव केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर चांगल्या सिनेमा आणि कलेचा अस्सल जाणकार म्हणूनही ओळखला जातो. प्रेम, विश्वास आणि भावनिक संघर्षावर आधारित एका सिनेमाने केवळ मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर राजकुमार रावलाही भुरळ घातली आहे. राजकुमार रावने या मराठी चित्रपटाला पाठिंबा देत, प्रेक्षकांन तो पाहण्याचे आवाहन केलं आहे.
तो मराठी चित्रपट आहे 'आरपार'. राजकुमार रावने 'आरपार' या मराठी चित्रपटासाठी इन्स्टाग्रामवर खास स्टोरी शेअर केली आहे, ज्यामुळे हा चित्रपट अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. राजकुमार रावने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत "Running in theatres. Must watch guys. #AarPar" असे लिहिले. तसेच राजकुमार रावने या पोस्टमध्ये चित्रपटातील प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, हृता दुर्गुळे आणि दिग्दर्शक गौरव पत्की यांना टॅग केलं.
१२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला 'आरपार' या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजकुमार रावसारख्या मोठ्या अभिनेत्याने दिलेल्या या पाठिंब्यामुळे ‘आरपार’ चित्रपटाला आणखी जास्त प्रसिद्धी मिळण्याची अपेक्षा आहे. या सिनेमात ललित व ऋता यांची हटके केमिस्ट्री बघायला मिळत आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं', याचे वर्णन दर्शविणारा हा सिनेमा आहे.