Rajkumar Rao-Patralekha Wedding: पत्रलेखाच्या लग्नाच्या ओढणीवरच्या ‘त्या’ बंगाली मॅसेजनं वेधलं सर्वाचं लक्ष, काय होतो त्याचा अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 10:30 AM2021-11-16T10:30:00+5:302021-11-16T10:30:42+5:30

Rajkumar Rao-Patralekha Wedding: नववधू बनलेली पत्रलेखा लाल साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. पत्रलेखाने लग्नात घातलेला दुपट्टाही तिच्या प्रेमाचा संदेश देताना दिसत होता.

rajkummar rao patralekhaa wedding know what is meaning of bangla text written on patralekhaa wedding saree | Rajkumar Rao-Patralekha Wedding: पत्रलेखाच्या लग्नाच्या ओढणीवरच्या ‘त्या’ बंगाली मॅसेजनं वेधलं सर्वाचं लक्ष, काय होतो त्याचा अर्थ?

Rajkumar Rao-Patralekha Wedding: पत्रलेखाच्या लग्नाच्या ओढणीवरच्या ‘त्या’ बंगाली मॅसेजनं वेधलं सर्वाचं लक्ष, काय होतो त्याचा अर्थ?

googlenewsNext

11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर राजकुमार राव (Rajkumar Rao) व पत्रलेखा (Patralekha) अखेर काल लग्नबंधनात अडकले. ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटाच्या सेटवर राजकुमार व पत्रलेखाची प्रेमकहाणी सुरू झाली होती. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते, पण करिअर मार्गी लागलं नव्हतं. या मार्गात कसोटीचे अनेक क्षण होते, संघर्ष होता.  या काळात राजकुमार व पत्रलेखा दोघांनीही एकमेकांना साथ दिली आणि करिअरच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर काल दोघांनीही  चंदीगडमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये दोघांनी लग्न केलं. या लग्नाचे (Rajkumar Rao-Patralekha Wedding ) अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंची चर्चा आहेच. पण त्यापेक्षा जास्त चर्चा आहे ती पत्रलेखानं लग्नात नेसलेल्या साडीची. पत्रलेखाने लग्नात घातलेला दुपट्टाही तिच्या प्रेमाचा संदेश देणारा होता.

 सिल्क कुर्ता, चुडीदार, गुलाबी दुपट्टा आणि त्यावर लाल रंगाची पगडी असा राजकुमारचा लूक  होता. तर पत्रलेखाने लाल रंगाची साडी परिधान केली होती.  सोबत लाल जाळीची ओढणी घेतली होती. या ओढणीच्या बॉर्डरवर बंगाली भाषेतील एक ओळ होती. होय, ‘मी माझं सर्व प्रेम तुझ्यासाठी अर्पण करते’, असा या ओळीचा अर्थ होता.

प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझाईनर सब्यसाची मुखर्जीने पत्रलेखा व राजकुमारचा लग्नाचा पोशाख डिझाईन केला होता.
याआधी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने देखील असाच खास मजकूर लिहिलेली ओढणी लग्नात परिधान केली होती.‘सदा सौभाग्यवती भव:’ असं तिच्या ओढणीवर लिहिलेलं होतं.  
काल लग्नानंतर राजकुमारने लग्नाचे फोटो त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले होते. ‘अखेर 11 वर्षांच्या प्रेम, रोमान्स, मैत्री आणि मस्तीनंतर, आज मी तिच्याशी लग्न करतोय.. तू माझी माझी सोबती, माझी चांगली मैत्रीण, माझे कुटुंब आहेस. आज तुझा पती बनलो, यापेक्षा माझ्यासाठी दुसरा आनंद नाही पत्रलेखा,’ असं त्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. 

Web Title: rajkummar rao patralekhaa wedding know what is meaning of bangla text written on patralekhaa wedding saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.