राजकुमार हिराणी क्रिकेटवर बनवणार सिनेमा?, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 08:00 IST2019-12-05T08:00:00+5:302019-12-05T08:00:00+5:30
बॉलिवूडमध्ये आणखीन एक क्रिकेटवर आधारीत चित्रपट बनवला जाणार आहे.

राजकुमार हिराणी क्रिकेटवर बनवणार सिनेमा?, वाचा सविस्तर
बॉलिवूडमध्ये क्रिकेट विश्वातील कपिल देव यांच्या जीवनावर आधारीत ८३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात आता बॉलिवूड दिग्दर्शक व निर्माते राजकुमार हिराणी देखील क्रिकेटवर आधारीत चित्रपट बनवणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
राजकुमार हिराणी यांना एकानंतर एक दोन क्रिकेटशी संबंधीत चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आला आहे.
राजकुमार हिराणी यांच्या आगामी चित्रपटाबद्दल बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेळावर आधारीत दोन स्क्रीप्टसाठी निर्मात्यांशी संपर्क साधण्यात आला आहे.
राजकुमार हिराणी यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार हिराणी यांना क्रिकेटवर आधारीत दोन चित्रपटांसाठी संपर्क साधण्यात आला आहे. त्यातील एक फॉक्स स्टारचा असून पियुष गुप्ता व नीरज सिंगद्वारा लिखित लाला अमरनाथ यांचा बायोपिक आहे.
तर याशिवाय क्रिकेटवर आधारीत एक अन्य कथा अभिजीत जोशी लिखित आहे, यादरम्यान आम्हाला ऐकायला मिळालं होतं की राजकुमार हिराणी वेबसीरिज बनवणार आहेत आणि काही अन्य स्क्रीप्टवर काम करत आहे. आता ते नेमक्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करणार आहे, हे आगामी काळात समजेल.