​रजनीकांतच्या ‘काली कालीकरन’चे नवे पोस्टर आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 15:40 IST2017-12-12T10:10:43+5:302017-12-12T15:40:43+5:30

आज (१२ डिसेंबर)सुपरस्टार रजनीकांत याचा वाढदिवस. या खास मुहूर्तावर रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘काला कालीकरन’चे  पोस्टर रिलीज केले गेले. या ...

Rajinikanth's new poster out of 'Kali Kaliikaran'! | ​रजनीकांतच्या ‘काली कालीकरन’चे नवे पोस्टर आऊट!

​रजनीकांतच्या ‘काली कालीकरन’चे नवे पोस्टर आऊट!

(१२ डिसेंबर)सुपरस्टार रजनीकांत याचा वाढदिवस. या खास मुहूर्तावर रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘काला कालीकरन’चे  पोस्टर रिलीज केले गेले. या पोस्टरमध्ये थलाईवा अर्थात रजनीकांतचे गँगस्टर लूक दिसते आहे. सोशल मीडियावर विराट कोहली व अनुष्का शर्माचे लग्न ट्रेंड करत असताना रजनीकांतचे चाहतेही मागे नाहीत. काल मध्यरात्रीपासून रजनीवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावर्षी रजनीकांतचा कुठलाही चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. पण येत्या वर्षात म्हणजे २०१८ मध्ये रजनीकांतचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यातला पहिला चित्रपट म्हणजे, ‘2.0’ आणि दुसरा चित्रपट म्हणजे ‘काली कालीकरन’.



‘2.0’ या चित्रपटात रजनीकांतसोबत अक्षय कुमार आणि एमी जॅक्सन मुख्य भूमिकेत आहेत. तर ‘काली कालीकरन’मध्ये नाना पाटेकर, हुमा कुरेशी आणि अंजली पाटीत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘काली कालीकरन’बद्दल खास सांगायचे म्हणजे, रजनीकांतचा जावई धनुष याने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे दोन पोस्टर्स रिलीज झाले आहे. साहजिकच ही पोस्टर्स पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘काली कालीकरन’ या चित्रपटात रजनीचा देशी अवतार पाहायला मिळेल, असे सांगितले जातेय. हा चित्रपट कधी रिलीज होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेकर्सनी आज रिलीज केलेल्या पोस्टरवरही रिलीज डेट दिलेली नाही.   केवळ ‘निअरिंग कम्पलिशन’ असे त्यावर लिहिले आहे. म्हणजेच हा चित्रपट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

ALSO READ : Happy Birthday rajinikanth : रजनीकांतबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत?

या अ‍ॅक्शनपटात रजनीकांत एका डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहे. एक तामिळ मुलगा लहानपणी घरातून पळून मुंबईत येतो आणि मुंबईचा डॉन बनतो, असे याचे कथानक आहे.  या चित्रपटाची कथा अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे आधी बोलले गेले होते. मात्र धनुषने याचे खंडन केले होते. हा चित्रपट कुठल्याही अर्थाने हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित नाही. चित्रपटाची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, असे धनुष म्हणाला होता.

Web Title: Rajinikanth's new poster out of 'Kali Kaliikaran'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.