रजनीकांतची मुलगी सौंदर्या घेणार घटस्फोट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 19:07 IST2016-12-24T19:07:27+5:302016-12-24T19:07:27+5:30
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा ‘थलैवा’ रजनीकांत हा सध्या ‘२.०’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असतानाच त्यांना नुकताच एक धक्का बसलाय. ...
.jpg)
रजनीकांतची मुलगी सौंदर्या घेणार घटस्फोट?
द क्षिणात्य चित्रपटसृष्टीचा ‘थलैवा’ रजनीकांत हा सध्या ‘२.०’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असतानाच त्यांना नुकताच एक धक्का बसलाय. त्यांची लाडकी लेक सौंदर्या आणि जावई आश्विन रामकुमार हे एकमेकांच्या समन्वयाने घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. अलीकडेच त्यांनी चैन्नईच्या कौटुंबिक न्यायालयात जाऊन घटस्फोटाबद्दल याचिका दाखल केली. त्यांना वेद नावाचा एक वषार्चा मुलगा असून, समुपदेशनाने त्यांच्यातील वाद कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून कळतेय.
![]()
व्यवसायाने निर्माती असलेली सौंदर्या हिने नुकतेच घरगुती कलहाच्या कारणावरून पती आश्विन रामकुमार याच्याविरूद्ध कौटुंबिक न्यायालयात याचिका सादर केली आहे. उद्योगपती आश्विनकुमार यांच्यापासून काही किरकोळ कारणांमुळे वेगळे होण्याच्या विचारात ती आहे. सप्टेंबरपासून त्यांच्यातील वाद माध्यमांपर्यंत पोहोचतच आहेत. सौंदर्या त्यांच्यातील वाद, भांडणे ट्विटरवर फॉलोअर्ससोबत शेअर करतच होती. मात्र, त्या वादांनी टोकाचं रूप घेतल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
![]()
सौंदर्या ही दक्षिणेतील एक उत्कृष्ट निर्माती, दिग्दर्शिका आहे. ती सध्या ‘वेल्लाई इल्ला पट्टाथारी’ (व्हीआयपी २) चित्रपटावर धनुषसोबत काम करतेये. यात बॉलिवूड अभिनेत्री काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काजोलची या चित्रपटात भूमिका कशी असेल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.