रजनीकांत कुटुंबासह अमेरिका टूरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 15:29 IST2016-05-29T09:59:50+5:302016-05-29T15:29:50+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आपल्या कुटुंबासह सुटीसाठी अमेरिका टूरवर असून, दिग्दर्शक शंकरच्या २.० या चित्रपटाची शुटींग आता जून महिन्यात होईल. ...

रजनीकांत कुटुंबासह अमेरिका टूरवर
द क्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आपल्या कुटुंबासह सुटीसाठी अमेरिका टूरवर असून, दिग्दर्शक शंकरच्या २.० या चित्रपटाची शुटींग आता जून महिन्यात होईल. रजीनकांत २.० आणि कबली हा चित्रपट करीत आहे. कबली हा तमिळी चित्रपट १ जुलै रोजी प्रदर्शित होतो आहे. शंकरच्या २.० या चित्रपटाचे शुटींगचे शेड्यूल पूर्ण केल्यानंतर रजनीकांतने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत तो दोन आठवडे राहणार आहे. दुसºया आठवड्यानंतर पुन्हा सेटवर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कबली चित्रपटात रजनीकांत गँगस्टरची भूमिका निभावत आहे. चेन्नई येथे राहणाºया डॉनवर आधारित हा चित्रपट आहे. शंकरचा २.० हा चित्रपट ब्लॉकबस्टर एंथीरनचा सिक्वेल आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ वासीगरन यांची भूमिका रजनीकांत करीत आहे.