मराठी चित्रपटातही दिसणार रजनीकांत! ममुटीही दिसणार सोबत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 14:14 IST2017-11-28T08:44:01+5:302017-11-28T14:14:01+5:30
सुपरस्टार रजनीकांत याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमी तितकीच खास आहे. त्यामुळे या बातमीचा आनंदही तितकाच खास असणार ...
.jpg)
मराठी चित्रपटातही दिसणार रजनीकांत! ममुटीही दिसणार सोबत!!
स परस्टार रजनीकांत याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमी तितकीच खास आहे. त्यामुळे या बातमीचा आनंदही तितकाच खास असणार आहे. होय, सुपरस्टार रजनीकांत आता मराठी चित्रपटात डेब्यू करणार आहे. केवळ रजनीकांत एकटाच नाही तर त्याच्यासोबत अभिनेता ममूटी हा सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. आहे ना खास बातमी? या मराठी चित्रपटाचे नाव ‘पसायदान’ असल्याचे कळतेय. विश्ेष म्हणजे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते मणिरत्नम हे हा चित्रपट प्रोड्यूस करताहेत. दीपक भावे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. येत्या नव्या वर्षांत या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल.
![]()
रजनीकांत व ममूटी या जोडीने अनेक साऊथ चित्रपटांत एकत्र काम केलेय. आता पुन्हा एकदा चाहत्यांना ही जोडी एकत्र दिसणार आहे.रजनीकांतच्या अनेक चित्रपटांत ममूटीने त्याच्या सहकाºयाची भूमिका साकारली आहे. अलीकडे ‘थलापैथी’ या मल्याळम चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली होती. हा चित्रपट लोकांना प्रचंड भावला होता. इतका की, हा चित्रपट दुसºयांदा रिलीज करावा लागला होता. केरळ व तामिळनाडूत या चित्रपटाने जोरदार कमाई केली होती.
ALSO READ : रजनीकांत यांचे ‘हे’ वक्तव्य कोणालाही सुपरस्टार बनवेल, वाचा सविस्तर!
तूर्तास रजनीकांत ‘2.0’ या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत अभिनेता अक्षय कुमारही दिसणार आहे. हा चित्रपट ३डीमध्ये बनवला जाणार असल्याची खबर आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय. चर्चा खरी मानाल तर, केवळ चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च कार्यक्रमावर मेकर्सने सुमारे ४० कोटी खर्च केलेत. चित्रपटाचे संपूर्ण प्रमोशन व मार्केटींगवर सुमारे १५० कोटी रुपए खर्च केला जाणार असल्याचे कळतेय.