रजनीकांत व अक्षय कुमारच्या ‘2.0’ने रिलीज आधी कमावले १९० कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 15:33 IST2017-06-13T10:03:40+5:302017-06-13T15:33:40+5:30
‘बाहुबली2’चे बॉक्सआॅफिसवरचे अभूतपूर्व यश आपण पाहिलेच. दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम स्थापित केले. पण ...
.jpg)
रजनीकांत व अक्षय कुमारच्या ‘2.0’ने रिलीज आधी कमावले १९० कोटी!
‘ ाहुबली2’चे बॉक्सआॅफिसवरचे अभूतपूर्व यश आपण पाहिलेच. दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम स्थापित केले. पण कदाचित विक्रम बनतात, ते तोडण्यासाठीच. होय, ‘बाहुबली2’चे बॉक्सआॅफिसवरचे विक्रम तोडण्यास कदाचित रजनीकांत व अक्षय कुमारचा ‘2.0’ हा आगामी सिनेमा सज्ज आहे. रजनीकांत व अक्षय कुमार या दोघांची जुगलबंदी म्हटल्यावर तसाही हा चित्रपट सुपरहिट आहेच. म्हणजे, तशी गॅरंटी आहे. जाणकारांचे मानाल तर, हा चित्रपट २०१८ मधील सगळ्यात मोठा ओपनर चित्रपट ठरणार आहे. कदाचित याच अपेक्षा बॉक्सआॅफिसवर कॅश करण्याची तयारीही सुरु झाली आहे. होय, रिलीजआधीच या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे थिएटर राईट्स ८० कोटी रूपयांत विकले गेले आहेत. इतकेच नाही तर सिनेमाचे सॅटेलाईट्स राईट्स झी टीव्हीने ११० कोटी रूपयांत विकत घेतले आहेत. म्हणजेच प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने १९० कोटींची कमाई केली आहे. अर्थात ही रक्कम फार नाहीच. कारण हा चित्रपट बनण्यासाठी तब्बल ४५० कोटी रुपए लागले आहेत. ४५० कोटींचा बजेट असलेला हा सिनेमा तेलगू व हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरे तर मेकर्सनी या चित्रपटाच्या थिएटर राईट्ससाठी एकूण १०० कोटींची मागणी केली होती. पण अखेर चर्चेअंती ८० कोटींवर गोष्ट जमली.या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्याशिवाय एॅमी जॅक्सनसुद्धा भूमिका साकारणार आहे. याचा फर्स्ट लूक पोस्टर आणि टीझर पोस्टरसुद्धा प्रदर्शित झालाय. शंकर यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात रजनीकांत दुहेरी भूमिका साकारणार आहे. यापूर्वी सिनेमातील अक्षय कुमारचा लूक सोशल मीडियावर लीक झाला होता. अक्षय कुमार यामध्ये एका दुष्ट शास्त्रज्ञाची भूमिका साकारताना दिसणार आहे.