डिम्पल कपाडियाच्या आधी या अभिनेत्रीसोबत लिव्ह-इनमध्ये होते राजेश खन्ना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 18:08 IST2020-04-13T17:53:06+5:302020-04-13T18:08:29+5:30
राजेश खन्ना यांच्या पर्सनल लाईफ इतकेच वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले.

डिम्पल कपाडियाच्या आधी या अभिनेत्रीसोबत लिव्ह-इनमध्ये होते राजेश खन्ना
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार आणि चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेता म्हणून राजेश खन्ना यांची ओळख आहे. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. राजेश खन्ना हे बॉलिवूडमधील एक सुपरस्टार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. राजेश खन्ना यांच्या पर्सनल लाईफ इतकेच वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले.
अंजू महेंद्रा आणि राजेश खन्ना यांचे अफेअर हे ते दोघे इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनचे होते. ते दोघे शाळेपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते. ते एकाच कॉलेजमध्ये शिकले होते. सात वर्षं तरी त्यांचे अफेअर सुरू होते. राजेश खन्ना त्या काळचे सुपरस्टार असल्याने या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. दोघे लिव्हइनध्येसुद्धा राहत होते. आराधना या चित्रपटानंतर तर राजेश खन्ना यांची पॉप्युलॅरिटी दिवसेंदिवस वाढतच होती.
राजेश खन्ना यांना मिळालेल्या या स्टारडममुळे त्यांचे पाय जमिनीवर राहिले नव्हते. आपल्याला मिळालेल्या यशाचा गर्व करू नये असे स्पष्ट मत अंजू यांचे असल्याने त्यांनी ही गोष्ट राजेश खन्ना यांना अनेकवेळा समजावली होती. पण त्यांना ही गोष्ट न पटल्याने त्यांनी अंजूसोबत नाते तोडण्याचे ठरवले. एवढचे नव्हे तर अंजू यांचे करियर संपुष्टात यावे यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले होते. एका मुलाखती दरम्यान अंजू यांनी सांगितले होते की, त्या खूप मोकळ्या विचारायच्या होत्या मात्र विनोद खन्ना ट्रेडिशनल विचाराचे होते. दोघांमध्ये नेहमीच मतभेद व्हायचे ऐवढेच नाही तर त्यांच्या स्कर्ट पासून ते साडी परिधान करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींवर आक्षेप घेतला.