‘राजा हिंदुस्तानी’चे अभिनेते व कथ्थक गुरु वीरु कृष्णन यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 15:00 IST2019-09-08T14:57:19+5:302019-09-08T15:00:01+5:30

प्रियंका चोप्रा, कतरीना कैफ, लारा दत्ता, अथिया शेट्टी अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांनी कथ्थक शिकवले. 

raja hindustani actor and kathak guru pandit veeru krishnan passed away | ‘राजा हिंदुस्तानी’चे अभिनेते व कथ्थक गुरु वीरु कृष्णन यांचे निधन

‘राजा हिंदुस्तानी’चे अभिनेते व कथ्थक गुरु वीरु कृष्णन यांचे निधन

ठळक मुद्देप्रियंका चोप्रा, कतरीना कैफ, लारा दत्ता, अथिया शेट्टी अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांनी कथ्थक शिकवले. 

अभिनेते व कथ्थक गुरू वीरु कृष्णन यांचे शनिवारी निधन झाले.  बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिने वीरू यांच्या निधनाची  ट्विटरवर शेअर केली आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
वीरू हे केवळ कथ्थक गुरु नव्हते तर अभिनेतही होते. राजा हिंदुस्तानी, अकेले हम अकेले तुम, इश्क या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. प्रियंका चोप्रा, कतरीना कैफ, लारा दत्ता, अथिया शेट्टी अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांनी कथ्थक शिकवले. 




अथियाने त्यांच्या निधनाचे वृत्त शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘ हे भगवान, अतिशय दु:खद. परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो, गुरुजी. अपार कष्ट आणि शिस्त शिकवल्याबद्दल तुमचे आभार,’ असे अथियाने लिहिले.



प्रियंका चोप्रा हिनेही ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘ मी नीट नाचूही शकत नव्हते तेव्हापासून तुम्ही मला कथ्थक शिकवले. नृत्यावरची तुमची आस्था, तुमचा संयम आणि जिद्द पाहून आम्ही केवळ कथ्थकच शिकलो नाही तर  अनेक गोष्टी शिकलो.  तुमची आठवण सदैव राहील गुरूजी,’ अशा शब्दांत प्रियंकाने भावना व्यक्त केल्या.




लारा दत्ता हिनेही वीरू यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. ‘गुरूजी तुम्ही सर्वोत्तम कथ्थक गुरु होतात. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते,’ असे तिने लिहिले.

Web Title: raja hindustani actor and kathak guru pandit veeru krishnan passed away