THROWBACK: -अन् राजकुमार यांनी गोविंदाने भेट दिलेला शर्ट फाडून त्याचा रूमाल बनवला...! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 08:00 IST2022-02-15T08:00:00+5:302022-02-15T08:00:03+5:30

Raj kumar-Govinda : बेफिकीर, बिनधास्त, कोणाच्याही बापाला न घाबरणारा अ‍ॅटिट्यूड घेऊनच राजकुमार जगले. त्यांच्या टशनचे एक ना अनेक किस्से आजही चवीने वाचले जातात.

raj kumar made a handkerchief by govinda favourite shirt who gifted by him to rajkumar | THROWBACK: -अन् राजकुमार यांनी गोविंदाने भेट दिलेला शर्ट फाडून त्याचा रूमाल बनवला...! 

THROWBACK: -अन् राजकुमार यांनी गोविंदाने भेट दिलेला शर्ट फाडून त्याचा रूमाल बनवला...! 

राजकुमार (Rajkumar ) हे बॉलिवूडमध्ये खरोखर एखाद्या राजकुमारासारखेच वावरले. पडद्यावर राजकुमार यांच्या एन्ट्रीलाच अशा काही टाळ्या पडायच्या की, अख्खा सिनेमा हॉल टाळ्यांनी बुजून जायचा. पडद्यावर त्यांचा वेगळा रूबाब होता. खऱ्या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता. बेफिकीर, बिनधास्त, कोणाच्याही बापाला न घाबरणारा अ‍ॅटिट्यूड घेऊनच ते जगले. त्यांच्या टशनचे एक ना अनेक किस्से आजही चवीने वाचले जातात. आज आम्ही असाच एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. होय, हा किस्सा आहे गोविंदाच्या (Govinda) शर्टचा. हा किस्सा आजही सांगितला जातो.

तर किस्सा आहे ‘जंगबाज’ या सिनेमाच्या सेटवर. 80 च्या दशकात आलेल्या या सिनेमात गोविंदा आणि राजकुमार एकत्र झकळले होते. एकेदिवशी शॉट संपला आणि गोविंदा व राजकुमार यांच्या गप्पा सुरू झाल्या. गोविंदानं घातलेला रंगीत शर्ट राजकुमार यांना आवडला होता. भाई, शर्ट तो तुम्हारी बहुत ही अच्छी है, अशा शब्दांत त्यांनी गोविंदाच्या शर्टचं कौतुक सुरू केलं. आता राजकुमार सारखा अ‍ॅक्टर तारीफ करतोय म्हटल्यावर काय? गोविंदा तर हुरळून गेला.

तो तडक उठला आणि मेकअप रूममध्ये गेला. त्याने अंगातलं शर्ट काढलं आणि ते राजकुमार यांना भेट म्हणून देण्यासाठी त्यांच्याजवळ गेला. राजकुमार यांना माझा शर्ट इतका आवडला तर तो त्यांना भेट द्यावा, इतकाच गोविंदाचा उद्देश होता. राजकुमार यांनीही गोविंदाने प्रेमानं दिलेली भेट स्वीकारली. 
पण काही दिवसानंतर गोविंदा व राजकुमार पुन्हा समोरासमोर आले. तेव्हा गोविंदाचं लक्ष त्यांच्या रूमालाकडे गेलं. राजकुमार यांनी त्याने भेट दिलेल्या शर्टचा रूमाल बनवला होता आणि तो लोकांना दिसेल असा खिशात घालून ते रूबाबात फिरत होते. 

Web Title: raj kumar made a handkerchief by govinda favourite shirt who gifted by him to rajkumar